मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

कोविड सेंटरमध्ये महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी अखेर राज्य सरकारकडून SOP जाहीर

कोविड सेंटरमध्ये महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी अखेर राज्य सरकारकडून SOP जाहीर

कोविड सेंटरमध्ये महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी अखेर ठाकरे सरकारने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

कोविड सेंटरमध्ये महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी अखेर ठाकरे सरकारने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

कोविड सेंटरमध्ये महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी अखेर ठाकरे सरकारने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

  • Published by:  Sunil Desale

मुंबई, 20 मे: राज्यातील कोविड सेंटर (Covid Center)मध्ये महिलांवर अत्याचार (Women harassment) झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. यामुळे कोविड सेंटंरमध्ये महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एसओपी जाहीर करावी अशी मागणी जोर धरत होती. अखेर आज राज्य सरकारने कोविड सेंटरसंदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर (SOP to combat sexual harassments complaints of women in Covid wards) केल्या आहेत.

पॅनिक अलार्म बटण

प्रत्येक महिला कोविड वॉर्डमध्ये एक पॅनिक अलार्म बटण असणे बंधनकारक आहे. या मार्गदर्शक सूचना तात्काळ लागू करण्यात याव्यात असंही राज्य सरकारने म्हटलं आहे. तसेच सीसीटीव्हीची देखरेख सुद्धा असणं सुद्धा आवश्यक आहे आणि महिला कोविड वॉर्डमध्ये उपचारासाठी महिला वैद्यकीय अधिकारी असणे बंधणकारक असल्याचंही या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे.

काय आहेत मार्गदर्शक सूचना

प्रत्येक महिला कोविड वॉर्डमध्ये पॅनिक अलार्म बटणे अनिवार्य

सीसीटीव्हीची देखरेख असावी

महिला कोविड वॉर्डमध्ये महिला वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टरांची उपस्थिती अनिवार्य

कोविड उपचारासाठी स्वतंत्र महिला वॉर्ड असणे आवश्यक आहे.

राज्यांचं कोरोना लशींसाठी ग्लोबल टेंडर; जगाला लस देणाऱ्या भारतावर का आली अशी वेळ?

राज्यात कोरोनाचा संसर्ग आल्यापासून गेल्या वर्षभराच्या कालावधीत राज्यातील विविध भागांत कोविड वॉर्ड तयार करण्यात आले. मात्र, याच कोविड वॉर्डमध्ये महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. या घटनांनंतर महिलांच्या सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत होती. त्यानंतर अखेर राज्य सरकारने महिला कोविड वॉर्ड संदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

First published:

Tags: Coronavirus, Maharashtra