राहुल खंदारे, बुलडाणा 05 नोव्हेंबर : मी सांगितलं होतं मी पुन्हा येईन. 106 वा आमदार द्या करेक्ट कार्यक्रम आम्ही करतो, असं म्हणालो होते. बोलल्याप्रमाणे आम्ही महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम केला आहे, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. यावर प्रत्युत्तर देत नाना पटोले यांनी फडणवीसांनाच टोला लगावला आहे. फडणवीस यांचाच कार्यक्रम करेक्ट झाला असल्याचं पटोले म्हणाले आहेत. फडणवीसांनी काँग्रेसचे 22 आमदार फोडले, चंद्रकांत खैरेंचा गौप्यस्फोट आज सकाळी पहाटे मॉर्निंग वॉकला निघालेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांवर पलटवार केला. मुख्यमंत्री राहिलेले आणि मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेले देवेंद्र फडणवीस हे आता उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांचाच कार्यक्रम हा करेक्ट झाला आहे, असं म्हणत नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीसांनाच टोला लगावला आहे. काय म्हणाले होते फडणवीस - आम्ही सांगितलं होतं की 106 वा आमदार द्या करेक्ट कार्यक्रम आम्ही करतो. आम्ही करेक्ट कार्यक्रम केला आणि तुमच्या तसंच पांडुरंगाच्या आशीर्वादाने सरकार आलं, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला होता. राज्यात होणार आणखी एक युती? नाना पटोले यांचं सूचक विधान काँग्रेस नेत्यांचं मॉर्निंग वॉक - राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर आहे. लवकरच ही यात्रा महाराष्ट्रामध्ये प्रवेश करणार आहे. त्या निमित्ताने महाराष्ट्राचे काँग्रेसचे नेते आता जय्यत तयारी करताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील या यात्रेचा शेवट बुलडाणा जिल्ह्यातील शेगावात होणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्या सहकाऱ्यांसह शेगावात सकाळी उठून मॉर्निंग वॉक करताना पाहायला मिळत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.