आधी 53 हजार नंतर पाठवले 1 लाखांचे वीज बिल, ग्राहकाने डोक्याला लावला हात!

आधी 53 हजार नंतर पाठवले 1 लाखांचे वीज बिल, ग्राहकाने डोक्याला लावला हात!

लॉकडाउनच्या काळात महावितरण विभागाडून मिटरचे रीडिंग न घेता सरासरी देयक नागरिकांना पाठविण्यात आली होती

  • Share this:

नालासोपारा, 10 मार्च : नालासोपाऱ्यात (nala sopara) एका गिरणीला 79 कोटींचे वीज बिल (electricity bill) पाठवल्याची घटना ताजी असताना पुन्हा एकदा रीडिंग एजन्सीच्या नाकर्तेपणामुळे वीज ग्राहकाला भुर्दंड पडल्याचे उघड झाले आहे. जास्तीचे बिल हे रीडिंग एजन्सीच पाप असून महावितरणला (mahadiscom) ताप झाल्याचे या बिलाच्या गोंधळावरून सिद्ध झाले आहे, तशी कबुलीच महावितरणच्या अधिकाऱ्याने दिली आहे.

नालासोपारा पश्चिमेकडील श्रीप्रस्थ सोसायटी बिल्डींगनंबर 22 बी विंग रूम नंबर 001 मध्ये सुजित सिंग यांनी मार्च 2019 ला वर्षापूर्वी घर घेतले होते. त्यांना दर महिन्याला 700 ते 850 रुपये वीज बिल येत होते. लॉकडाउन लागू झाल्यापासून बिल भरलं नव्हतं. त्यामुळे जून 2020 ला 3450  तीन महिन्याचे बिल आलं आणि दुसऱ्याच महिन्यात जुलै महिन्या तब्बल 53 हजारांचे बिल आले. ऑगस्ट 2020 ला एसव्हीआरला चेकिंग करण्यासाठी येतो सांगितले पण ते आलेच नाही. मात्र जानेवारी 2021 ला तब्बल १००१४० बिल आले त्यामुळे सुजित सिंग यांना एकच धक्का बसला. त्यांनी महावितरण कार्यालयात धाव घेतली आणि तक्रार दिली. त्यानंतर महावितरणचे अधिकारी शिंदे यांनी 30 टक्के कपात करून ६४००० भरण्यास सांगितले.

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या सर्व्हर रुमवर 'सायबर हल्ला'

फेब्रुवारी 2021 ला एसव्हीआर केले असता मिटर नंबर ०३२९१४८५ वरील आणि बिलावरील नंबर ०८२०३२९१४२५ मध्ये तफावत असल्याचे समोर आले. वसई विरारमध्ये लॉकडाउन आणि नंतरच्या काळात महावितरण विभागाचा पुरता गोंधळ उडाला आहे. ग्राहकांना लाखो आणि कोट्यावधीची बिले आल्याचे प्रकार उघडकीस आल्याने महावितरण कंपनीच्या कारभारावर अनेक प्रश्न उभे राहत आहेत. महावितरण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यापर्यंत  २ लाख ४२ हजार ६९६ वाढीव वीज देयकाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

लॉकडाउनच्या काळात महावितरण विभागाडून मिटरचे रीडिंग न घेता सरासरी देयक नागरिकांना पाठविण्यात आली होती. यात नागरिकांना हजारो आणि लाखोची देयक आली आहेत. महावितरण विभागाकडून जून २०२० पासून मिटर रीडिंग घेतले जात असल्याचे सांगितले होते. पण त्यानंतर सुद्धा नागरिकांना वाढीव बिले येण्याचे प्रकार सुरूच असल्याने महावितरण कंपनीकडून मीटरचे रीडिंग घेणाऱ्या कंपनीकडून चुकीचे रीडिंग घेतल्याने नागरिकांना वाजवीपेक्षा अधिक बिले येणाच्या तक्रारींचा पाऊस पडत आहे.

खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून FIR दाखल

वसई विरार परिसरात मागील काही महिन्यापासून ग्राहाकांना अव्वाच्या सव्वा बिले येत आहेत. त्यात महावितरण विभागाकडून नेमलेल्या ठेकेदाराकडून घेतले जाणारे मिटरचे रीडिंग चुकीच्या पद्धतीने घेतले जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.  दरम्यान, एजन्सीने एकत्र रीडिंग घेतल्याने हे बिल जास्त आले असून त्यांना सुलभ हफ्ते करून दिल्याचे दिले असून कामचुकार करून रीडिंग घेणाऱ्या एजन्सीविरोधात वरिष्ठांना तक्रारी करण्यात आल्या आहेत, असं अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुरेंद्र मुंगारे यांनी सांगितले.

Published by: sachin Salve
First published: March 10, 2021, 10:34 AM IST

ताज्या बातम्या