मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मुंबईजवळील शहरात महिलेवर तब्बल 4 वेळा बलात्कार, डिलिव्हरी बॉयने केलं संतापजनक कृत्य

मुंबईजवळील शहरात महिलेवर तब्बल 4 वेळा बलात्कार, डिलिव्हरी बॉयने केलं संतापजनक कृत्य

महिलेवर चार वेळा सामुहिक बलात्कार (Gang Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

महिलेवर चार वेळा सामुहिक बलात्कार (Gang Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

महिलेवर चार वेळा सामुहिक बलात्कार (Gang Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नालासोपारा, 20 मार्च : नालासोपारा येथे एका घरकाम करणाऱ्या महिलेवर त्रिकुटाने नोकरी देण्याच्या नावाखाली चार वेळा सामुहिक बलात्कार (Gang Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी नालासोपारा पोलीस (Nalasopara Police) ठाण्यात गुन्हा दाखल करून तीन जणांना पोलिसांनी अटक केली.

नालासोपारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील हनुमान नगर परिसरात दोन युवकांनी विरार ग्लोबल सिटीमध्ये घरकाम करणाऱ्या एका 37 वर्षीय महिलेवर चारवेळा सामुहिक बलात्कार केला आहे. यात पीडित महिला ही विरार येथील ग्लोबल सिटी परिसरात एका घरात घरकाम करत होती. याठिकाणी अ‍ॅमेझोन वरून मागविलेल्या सामानाची डिलिव्हरी करणारा एक युवक सातत्याने येत असल्याने त्याच्या बरोबर तिची ओळख झाली.

हेही वाचा - बकऱ्यांना चरण्यासाठी घेऊन गेलेल्या महिलेसोबत घडलं विपरीत; गळा आवळून झाला खून

ओळखीतून या युवकाने महिलेला दुसरीकडे चांगले काम मिळवून देतो सांगून, तिला दुचाकीवरून हनुमान नगर परिसरातील एका इमारतीत नेले. तिथे त्याचा आणखी एका मित्र आधीच हजर होता. दोघांनी तिच्यावर अत्याचार करत तिची चित्रफित तयार केली आणि त्या आधारे तिला धमकावून तिच्यावर चार वेळा सामुहिक बलात्कार केला.

त्यानंतर तिसऱ्या एका मित्राला त्यांनी तिचा मोबाईल क्रमांक देवून त्याने सुद्धा तिला धमकावून संबध प्रस्तापित करण्याचा प्रयत्न केला. यामुळे या महिलेने नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी अमित तिवारी 23, पवन द्विवेदी 21 ,धीरज पाल 21 यांना अटक केली आहे.

दरम्यान, याप्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लबदे यांनी दिली आहे.

First published:
top videos

    Tags: Crime, Crime news, Maharashtra, Mumbai, Nalasopara, Rape case, Shocking news