राजा मायाळ, प्रतिनिधी अर्नाळा : राज्यात पाऊस मुसळधार सुरू आहे. त्यामुळे या पावसाळ्यात फिरण्याचा, धबधब्यावर जाण्याचा किंवा पोहोयला जाण्याचा मोह जरा आवरताच घ्यायला हवा. त्याचं कारण म्हणजे हाच मोह अंगाशी येऊ शकतो. एका तरुणासोबत अत्यंत हृदयद्रावक घटना घडल्याचं समोर आलं आहे. अर्नाळा समुद्रात 18 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर एक हृदयद्रावक व्हिडीओ समोर आला आहे. अर्नाळा समुद्रात मित्रांसोबत पोहायला गेलेल्या एका मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. अमित संतोष गुप्ता ( वय 18) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असल्याची माहिती मिळाली आहे. अमित नालासोपारा पूर्व आचोळा इथला रहिवासी आहे. काल सायंकाळी 3 मित्रा सोबत अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर पोहायला गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने अमित पाण्यात बुडाला. त्याला बाहेर काढलं तेव्हा तो बेशुद्ध अवस्थेत होता. त्याला तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. तोपर्यंत उशीर झाला होता. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं खरं मात्र त्यााल मृत घोषित करण्यात आलं. याबाबत विरार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. वसई विरार नालासोपाऱ्यात मागच्या 4 दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे.. वसई तालुक्यातील समुद्र किनाऱ्यावर हाय अलर्ट करण्यात आला आहे.. तरीही हौशी पर्यटक समुद्र किनाऱ्यावर जाऊन पोहत असल्याने अशा घटना घडत आहेत. त्यामुळे पर्यटकांनी समुद्र किनाऱ्यावर जाऊन आपला जीव गमावू नये असे अहवान प्रशासना कडून करण्यात येत आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.