मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Mumbai : नायर हॉस्पिटलचं धक्कादायक वास्तव; तब्बल 8 महिने करावं लागतं उपचारासाठी वेटींग

Mumbai : नायर हॉस्पिटलचं धक्कादायक वास्तव; तब्बल 8 महिने करावं लागतं उपचारासाठी वेटींग

 नायर शासकीय हॉस्पिटलमध्ये (Government Hospital ) रुग्णांना सध्या अपुऱ्या सुविधा अभावी विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

नायर शासकीय हॉस्पिटलमध्ये (Government Hospital ) रुग्णांना सध्या अपुऱ्या सुविधा अभावी विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

नायर शासकीय हॉस्पिटलमध्ये (Government Hospital ) रुग्णांना सध्या अपुऱ्या सुविधा अभावी विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

  मुंबई, 02 ऑगस्ट :  मुंबई मधील पालिकेचे नायर हॉस्पिटल ( Nair Hospital In Mumbai ) हे एक महत्वाचं हॉस्पिटल मानले जाते. अनेक भागातून या हॉस्पिटलमध्ये रूग्ण उपचार ( Treatment ) घेण्यासाठी येत असतात. मात्र, मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या या नायर शासकीय हॉस्पिटलमध्ये (Government Hospital ) रुग्णांना सध्या अपुऱ्या सुविधा अभावी विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे रुग्णांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नायर हॉस्पिटलमध्ये या सुविधांचा आभाव  रुग्णांना आर्थिक भार कमी पडावा यासाठी सरकारी हॉस्पिटलची निर्मिती केली गेलेली असते. मात्र, नायर हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी वार्ड मध्ये बेड ची कमतरता, ओपीडी मध्ये औषधे नसणे, शौचालयाची दुरावस्था, एम आर आय, सिटी स्कॅन, एक्स रे साठी लागणार वेटींग अशा अनेक समस्या रुग्णांना भेडसावत आहे. त्यामुळे मुंबई मधील पालिकेच्या या नायर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे हाल होत आहेत.

  हेही वाचा: Pune : नात्याच्या जपणूकीसह पर्यावरणाचं रक्षण करणारी स्पेशल Seed Rakhi, पाहा VIDEO

  शिवाजी कोंडविलकर हे हृदयाच्या आजाराने त्रस्त असून त्यांना एम आर आय करायचा होता. मात्र, त्यांना 8 ते 10 महिन्यानंतर तारीख मिळाली. शिवाजी सांगतात की, मी हार्ट पेशंट आहे. मला डॉक्टरांनी एम आर आय करण्यासाठी सांगितला होता. यासाठी मी 8 महिन्या आगोदर नोंदणी केली होती. आता मला 8 महिन्यानंतर तारीख मिळाली हे कस चालणार? 8 महिने आम्हाला वेटींग करावं लागत.

  इमर्जेन्सी असेल तर खाजगी मधून करा असं डॉक्टर सांगतात. मात्र, इतकी चांगली परिस्थीती नाही की यासाठी आम्ही 10 हजार रुपये अधिकचे घालवू. नायर हॉस्पिटलमध्ये  एम आर आयची किंमत 2500 इतकी आहे मात्र हीच किंमत खाजगी रुग्णालयात 15 ते 18 हजार इतकी आहे. खाजगी हॉस्पिटलमध्ये एम आर आय काढणे सर्वसामान्य रुग्णांना परवडत नाही. त्यामुळे रुग्ण येथे उपचार घेण्यासाठी येतात. उत्तरप्रदेश मधुन आलेले अणि सध्या मुंबईत वास्तव्यास असलेले विजय कुमार सांगतात की, मला बेड ऊपलब्ध होत नव्हता वरच्या मजल्यावर बेड मिळाला मात्र तिथे स्वच्छतेची कमतरता होती. वास येत होता. शेवटी कसेतरी आम्हाला बेड मिळाला. दमछाक सहन करावी लागली. नायर हॉस्पिटलमध्ये औषधे घेण्यासाठी मेडिकल आहे मात्र तरीही इथे फक्त कॅल्शियमच्या गोळ्या मिळतातं बाकी औषधांसाठी खाजगी मेडिकल मध्ये जावं लागत अशी खंत रूग्ण व्यक्त करत आहेत. त्यामुळे प्रशासनाने हॉस्पिटलमध्ये ज्या समस्या आहेत .त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, अशी मागणी येथील उपचारासाठी आलेल्या रुग्णांनी केली आहे.

  हेही वाचा: Aurangabad : दहावीनंतर व्यवसाय करण्यासाठी 'हा' कोर्स करा, तुमचा होईल फायदा VIDEO

  मेडिकल मध्ये औषधांची कमतरता  सना खान गेले अनेक दिवसांपासून मेडिकल मध्ये काम करतात. मात्र मेडिकल मध्ये काही औषधे उपलब्ध नसल्याने त्यांना खाजगी मेडिकल मधून औषधे विकत घ्यावी लागत आहेत. सना म्हणाल्या औषधांची कमतरता आहे. यासाठी अधिकचा पैसा देखिल खर्च करावा लागत आहे. हॉस्पिटलला अतिरिक्त रुग्णांचा ताण हा सोसावा लागतोय  दरम्यान, याबाबत हॉस्पिटलच्या ज्येष्ठ डॉक्टर यांना विचारण्यात आले त्यावर त्यानी नावं न घेण्याच्या अटीवर सांगितले की, हॉस्पिटलला अतिरिक्त रुग्णांचा ताण हा सोसावा लागत आहे. एम आर आय साठी वेटींग आहे. छोट्या मोठ्या हॉस्पिटल मध्ये देखिल एम आर आय असणे आवश्यक आहे. अनेक राज्यांतून देखील रूग्ण मुंबईतील मोठ्या सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येत असतात म्हणून त्या त्या राज्यात देखिल चांगली हॉस्पिटल उभारणे आवश्यक आहे.
  First published:

  Tags: Health, Mumbai

  पुढील बातम्या