मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

वाचनालयात अभ्यास करणाऱ्या तरुणाचा खून हत्या, भंडाऱ्यातील धक्कादायक घटना

वाचनालयात अभ्यास करणाऱ्या तरुणाचा खून हत्या, भंडाऱ्यातील धक्कादायक घटना

प्रकल्पग्रस्त असलेला अतुल वंजारी हा तरुण अन्नाजी कुलकर्णी सार्वजनिक वाचनालयात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत होता.

प्रकल्पग्रस्त असलेला अतुल वंजारी हा तरुण अन्नाजी कुलकर्णी सार्वजनिक वाचनालयात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत होता.

प्रकल्पग्रस्त असलेला अतुल वंजारी हा तरुण अन्नाजी कुलकर्णी सार्वजनिक वाचनालयात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bhandara, India
  • Published by:  News18 Desk

भंडारा, 3 सप्टेंबर : वाचनालयात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणाचा देशी कट्ट्यातून गोळी झाडून खून करण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भंडारा शहरातील अन्नाजी कुलकर्णी सार्वजनिक वाचनालयात आज शनिवारी घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळावरून तासिका तत्त्वावर शिक्षक असलेल्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. देशी कट्ट्याने खून करण्याच्या या घटनेने भंडारा शहरात एकच खळबड उडाली आहे. अतुल बाळकृष्ण वंजारी (वय-30, रा. शास्त्री वॉर्ड, गणेशपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर गंगाधर नारायण निखारे (वय-42) असे आरोपीचे नाव आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

प्रकल्पग्रस्त असलेला अतुल वंजारी हा तरुण अन्नाजी कुलकर्णी सार्वजनिक वाचनालयात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत होता. हे वाचनालय भंडारा शहरातील हेडगेवार चौकात आहे. शनिवारी दुपारी तो अभ्यास करीत असताना त्याठिकाणी गंगाधर निखारे आला आणि त्याने देशी कट्ट्यातून अतुलच्या पाठीवर गोळी झाडली. काही क्षणातच तो रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. तेथे उपस्थित काही जणांनी आरोपी गंगाधर याला पकडून ठेवले.

तसेच या घटनेची माहिती भंडारा शहर पोलिसांना देण्यात आली. यानंतर भंडाऱ्याचे ठाणेदार सुभाष बारसे पथकासह तत्काळ दाखल झाले. यादरम्यान, जखमी अतुलला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

गंगाधार निखारे हा उच्च शिक्षित असून तो भंडारा शहरातील एका महाविद्यालयात तसिका तत्वावर भौतिकशास्त्र विषय शिकवित होता. तेव्हा तो परिरवारसह अतुल वंजारी यांच्या घरी भाड्याने राहत होता. मात्र, सध्या तो कोंढा येथील एका महाविद्यायात तासिका तत्वावर कार्यरत आहे. अतुलकडे राहताना त्यांच्यात 2020 पासून वाद सुरू होता. याप्रकरणी भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल होता. मात्र, शनिवारी गंगाधर भंडारा येथे एका महाविद्यालयात मुलाखत देण्यासाठी आला.

हेही वाचा - मुख्याध्यापकाचं अपहरण, किडनॅपर्सकडून 30 लाखांच्या खंडणीची मागणी, नागपूरमध्ये खळबळ

मुलाखत आटोपल्यावर तो अतुल अभ्यास करीत असलेल्या वाचनायलात पोहोचला आणि देशी कट्ट्यातून गोळी झाडून त्याने अतुलचा खून केला. तर अलिकडच्या काळात देशी कट्टा चालवून खून करण्याची भंडारा शहरातील ही पहिलीच घटना आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

First published:

Tags: Bhandara Gondiya, Crime news, Murder