मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पर्सनल डायरी काका-काकूने वाचली, अन् नागपुरातील उच्चशिक्षित तरुणीचं टोकाचं पाऊल

पर्सनल डायरी काका-काकूने वाचली, अन् नागपुरातील उच्चशिक्षित तरुणीचं टोकाचं पाऊल

24 एप्रिल रोजी काका-काकू धापेवाडा येथे आले असता त्यांनी निकीताची डायरी वाचली व त्याच्या काही पानांचे फोटो काढले.

24 एप्रिल रोजी काका-काकू धापेवाडा येथे आले असता त्यांनी निकीताची डायरी वाचली व त्याच्या काही पानांचे फोटो काढले.

24 एप्रिल रोजी काका-काकू धापेवाडा येथे आले असता त्यांनी निकीताची डायरी वाचली व त्याच्या काही पानांचे फोटो काढले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India

नागपूर, 21 जुलै : आजही अनेक जण पर्सनल डायरी लिहितात. त्यात डायरीत आपल्या जीवनाशी संबंधित अनेक वैयक्तिक महत्त्वाची गोष्टी, घटना याबाबत नोंद करतात. ही पर्सनल डायरी अनेक जपून ठेवतात, ती डायरी कुणाच्या हातात जाऊ नये, याचीही काळजी घेतात. मात्र, आपली पर्सनल डायरी काका-काकूच्या हातात लागल्यानंतर एका उच्चशिक्षित तरुणीने टोकाचं पाऊल उचललं आहे. नागपुरातील या तरुणीने आत्महत्या करत जीवन संपवले. नागपूर जिल्ह्यातील सावनेर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या धापेवाडा येथे ही घटना घडली.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

निकिता डहाट असे मृत तरुणीचे नाव आहे. ती लहानपणापासूनच आजोबा रामाजी डहाट यांच्यासह धापेवाडा येथे राहत होती. तिला आई, मोठी बहीण व भाऊ आहेत. तिने एमएस्सीपर्यंत शिक्षण घेतले होते. तसेच एका खासगी कंपनीत तिला नुकतीच नोकरोदेखील लागली होती. याप्रकरणी तिच्या भाऊ पंकज याने पोलिसांत तक्रार दिली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मृत तरुणीला लहानपणापासूनच रोज डायरी लिहिण्याची सवय होती. तिच्या चुलत बहिणीची काही महिन्यांअगोदर शस्त्रक्रिया झाली होती. यामुळे तिच्या काकाने निकीताला मदतीसाठी बोलावून घेतले होते. मात्र, इथे आल्यानंतर तिच्यासोबत धक्कादायक प्रकार घडला. काका-काकूने तिला 15-20 दिवस अक्षरश: नोकराप्रमाणे वागणूक दिली. इतकेच नव्हे तर चुलतबहिणीसोबतच पुणे येथे जा यासाठी दबावही टाकला. मात्र, तिच्या आजोबांनी याला नकार दिला. तर निकिताला मिळालेल्या वागणुकीमुळे तिने आपल्या पर्सनल डायरीत काकूला ‘डेव्हील ऑफ द फॅमिली’ असे उद्देशून लिहिले होते.

दरम्यान, 24 एप्रिल रोजी काका-काकू धापेवाडा येथे आले असता त्यांनी निकीताची डायरी वाचली व त्याच्या काही पानांचे फोटो काढले. याबाबत निकीताला माहित झाल्यावर ती तणावात आली होती. तसेच काका व काकू माझी बदनामी करतील, अशी तिला भिती वाटत होती. निकिताने मला ‘डेव्हील’ कसे काय लिहिले याचा सर्व नातेवाईकांसमोर जाब विचारू, अशी काकूने भूमिका घेतल्याने निकिता तणावात आली होती. याच तणावातून तिने 14 जुलैला गळफास घेत आत्महत्या केली.

हेही वाचा - स्कूल व्हॅन दारासमोर, आईकडून चॉकलेट घेऊन थेट तोंडात टाकलं; 6 वर्षीय चिमुरडीचा जागेवरच मृत्यू

याप्रकरणी मृत तरुणी निकिता डहाट हिचा भाऊ याने पोलिसांत तक्रार दिली आहे. मृत तरुणीने काका-काकूकडून होणाऱ्या मानसिक छळाबाबत आपल्या भावाजवळ कैफियत मांडली होती. तसेच ही डायरी भावानेदेखील वाचली नाही ती त्यांनी कशी वाचली, हा तिचा सवाल होता. तिने आपल्या भावाला 2 जुलै रोजी भेटून सर्व गोष्टी सांगितल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी काका रत्नाकर डहाट व काकू मंगला डहाट (रा.सुयोग नगर, नागपूर) यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

First published:
top videos

    Tags: Nagpur News, Suicide case