बंगळुरू, 21 जून : कर्नाटकच्या (Karnatak News) उडपी जिल्ह्यात बुधवारी 6 वर्षांच्या एका चिमुरडीच्या गळ्यात चॉकलेट अडकल्यामुळे मृत्यू झाल्याचा धक्कादायक (Shocking News) प्रकार समोर आला आहे. चिमुरडी घराबाहेर उभ्या असलेल्या शाळेच्या व्हॅनमध्ये चढणार होती, तेवढ्यात हा भयंकर प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सामन्वी शाळेत जाण्यासाठी तयार नव्हती. आई-वडील आणि कुटुंबीयांनी तिला कसं-बसं करुन शाळेत जाण्यासाठी तयार केलं. आई सुप्रिता पुजारीने सामन्वीला शाळेत जाण्यास तयार करण्यासाठी एक चॉकलेटही दिलं. यादरम्यान शाळेची व्हॅन आली. वॅन पाहून सामन्वीने रॅपरसह चॉकलेट तोंडात टाकलं. त्यादरम्यान तिला (Six year old girl dies of choking on chocolate) श्वास गुदमरला आणि व्हॅनच्या दिशेने जात असतानाही रस्त्यात चक्कर येऊन खाली कोसळली.
रुग्णालयात जाण्यापूर्वीच सामन्वीचा मृत्यू… सामन्वीला शुद्धीवर आणण्यासाठी बस ड्रायव्हर आणि कुटुंबीयांनी प्रयत्न केला. मात्र ती बेशुद्ध पडून राहिली, यानंतर कुटुंबीयांनी तिला जवळील रुग्णालयात हलवलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. सामन्वीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच नेमका प्रकार समोर येईल. दुसरीकडे शाळेने सामन्वीच्या मृत्यूची माहिती कळताच शाळेला सुट्टी जाहीर केली. सामन्वी विवेकानंद इंग्लिश मीडियम शाळेत पहिल्या वर्गात शिकत होती. रॅपरसोबत चॉकलेट खाल्ल्यामुळे श्वास गुदमरून तिचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.