नागपूर, 21 सप्टेंबर : नागपूरच्या एका नामांकित हॉटेलमधून दोन उझबेकिस्थानिक महिलांना अटक करण्यात आली आहे. व्हिसा संपल्यानंतर देखील त्या बनावट आधार कार्ड तयार करून भारतात राहत होत्या. तसेच एका भारतीय दलालामार्फत हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवत होत्या. या संदर्भात नागपूर पोलिसांनी दोन्ही महिलेसह दलाला अटक केली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - नागपूर पोलिसांच्या अटकेत असलेल्या या दोन उझबेकिस्थानी महिला मागच्या पाच वर्षापासून भारतामध्ये हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवत होत्या. त्या ज्या टुरिस्ट व्हिसावर भारतात आल्या होत्या तो व्हिसा संपून तीन वर्षे झाली होती. मात्र, तरीही नाव बदलवून बनावट आधार कार्ड तयार केले आणि इतर कागदपत्रांच्या मदतीने त्या भारतात वास्तवात होत्या. या दोन्ही महिलांच्या संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनोज गणेशाणी नावाचा दलाल हा या दोन्ही महिलांच्या संपर्कात होता आणि ग्राहक मिळवून देण्यास त्यांना मदत करत होता. मागच्या पाच वर्षापासून त्या सर्रास देहविक्रीचा व्यवसाय जोमाने करत होत्या. त्या नागपूरला आल्या असता पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, एका पंचतारांकित हॉटेलमध्ये या दोन महिन्यात थांबल्या आहे. त्यानंतर नागपूर पोलिसांनी सापळा रचून दलाला सह या दोन्ही आरोपी महिलांना अटक केली आहे. हेही वाचा - पत्नीसोबत अनैतिक संबंधाचा संशय, गोंदियातील विवाहित तरुणासोबत भयानक कृत्य या उझबेकिस्थानी महिला विमानाने नागपूर, मुंबई, दिल्लीसह वेगवेगळ्या शहरात फिरायच्या. त्या शहरातील नामांकित हॉटेलमध्ये उतरायच्या. तसेच याठिकाणी देहव्यवसाय केला की परत पुढच्या शहरात जायच्या. धक्कादायक बाबमध्ये बनावट कागदपत्राच्या आधारे या काळात त्या अनेक वेळा उझबेझिस्थान येथेदेखील जाऊन परत आल्या आहेत. त्यांच्या अटकेनंतर मोठी खळबळ उडाली आहे. आता नागपूर पोलीस या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटमध्ये आणखी किती उझबेकिस्थानी महिलांचा समावेश आहे याचा शोध घेत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.