मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पत्नीसोबत अनैतिक संबंधाचा संशय, गोंदियातील विवाहित तरुणासोबत भयानक कृत्य

पत्नीसोबत अनैतिक संबंधाचा संशय, गोंदियातील विवाहित तरुणासोबत भयानक कृत्य

दिलीप संतराम अरकरा (वय 35) असे या विवाहित तरुणाचे नाव आहे.

दिलीप संतराम अरकरा (वय 35) असे या विवाहित तरुणाचे नाव आहे.

दिलीप संतराम अरकरा (वय 35) असे या विवाहित तरुणाचे नाव आहे.

  • Published by:  News18 Desk
गोंदिया, 20 सप्टेंबर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या प्रियकराच्या पत्नीची प्रेयसीनेच सुपारी देत हत्या केल्याची घटना नुकतीच पनवेल मध्ये समोर आली होती. ही घटना ताजी असतानाच विदर्भातील गोंदिया येथूनही धक्कादायक बातमी समोर आली आहे. अनैतिक संबंधातून एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - देवरी तालुक्याच्या तुमडीमेंढा येथील एका तरुणाचा अनैतिक संबंधातून खून करण्यात आला. दिलीप संतराम अरकरा (वय 35) असे या विवाहित तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पोलिसांनी अवघ्या चार तासांत तीन आरोपींना अटक केली. तसेच सोमवारी अटक करून त्यांना चिचगड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. दिलीप संतराम अरकरा याचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपी रतिराम दशरथ कुंभरेला होता. त्यामुळे आरोपी रतिराम कुंभरे याने आरोपी छेदीलाल कारुजी आचले आणि मोतीराम पांडुरंग नेताम (सर्व रा. तुमडीमेंढा) यांच्या मदतीने कुऱ्हाडीने सपासप वार करून दिलीप अरकराची हत्या केली. तसेच मृतदेह कुणालाही दिसू नये म्हणून मृतदेहाच्या कमरेला दगड बांधला आणि दिलीपचा मृतदेह हा नाल्याच्या पाण्यात फेकून दिला. यासंदर्भात मृताची पत्नी पुष्पा दिलीप अरकरा (वय 26) यांनी 17 सप्टेंबरला चिचगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. याच दरम्यान, दिलीप अरकरा याचा मृतदेह तुमडीमेंढा शेतशिवाराजवळील जंगलातील नाल्याजवळ आढळला. हेही वाचा - नागपूर : पत्नीसोबत सतत व्हायचा वाद; कंटाळलेल्या पतीने मध्यरात्रीच भांडणाचा केला भयानक शेवट या घटनेसंदर्भात चिचगड पोलिसांनी भादंविच्या कलम 302, 201 अन्वये गुन्हा नोंद केला. या प्रकरणाचा तपास गोंदिया स्थानिक गुन्हे शाखा आणि चिचगड पोलिसांनी केला आणि अवघ्या चार तासांच्या आरोपी रतिराम दशरथ कुंभरे, छेदीलाल कारुजी आचले व मोतीराम पांडुरंग नेताम सर्व रा. तुमडीमेंढा या तीन आरोपींना अटक केली. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शरद पाटील हे करीत आहेत.
First published:

Tags: Bhandara Gondiya, Murder, Women extramarital affair

पुढील बातम्या