नागपूर, 05 डिसेंबर : पार्टी असो की हल्ली तीनचार दिवस चालणारे लग्नसमारंभ सोहळे, यामध्ये वापरले जाणारे महागडे कपडे एकदोनदा वापरल्या नंतर ते क्वचितच पुनः पुन्हा वापरण्याचा योग येतो. त्यानंतर हे कपडे कपाटाच्या एका कोपऱ्यात पडून असतात. त्याचं प्रमाणे सोन्याच्या दरात दिवसेंदिवस होणारी वाढ बघता विविध प्रकारच्या कृत्रिम दागिन्यांचा देखील कल वाढला आहे. अशाच महागड्या कपड्यांपासून ते कृत्रिम आकर्षक ज्वेलरी पर्यंतचे साहित्य अल्प दरात भाड्याने उपलब्ध करून दिल्याने नागपूर शहरात नवा ट्रेंड सुरू झाला आहे.
हल्ली मोठ्या शहरांत थिमबेस लग्न समारंभ मोठ्यप्रमाणावर होत असल्याचे चित्र सर्वत्र बघायला मिळत आहे. त्यात तीन चार दिवस चालणाऱ्या संगीत, मेहंदी, लग्न, स्वागत सोहळ्यासाठी विविध प्रकारच्या आकर्षक ड्रेस, ज्वेलरीला मागणी असते. काहीतरी हटके लूक करण्याचा प्रत्येकाचा मानस असतो. मात्र,आर्थिकदृष्ट्या ते सर्वांनाचं परवडेल असे देखील नाही. यासाठी एक उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे, तो म्हणजे महागडे ड्रेस, आर्टिफिशियल ज्वेलरी. हे साहित्य अल्प दरात भाड्याने उपलब्ध करून देणारे दुकान शहरात असून ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सोन्याच्या दागिन्याला पर्याय
लग्नसराईचे दिवस असल्याने ब्रायडल डिझायनर ज्वेलरीला सर्वाधिक मागणी आहे. संगीत, मेहंदी, लग्न, स्वागत सोहळ्यासाठी विविध प्रकारच्या ज्वेलरीला देखील मागणी असते. तसेच सोन्याचे दागदागिन्यांना पर्याय म्हणून हल्ली कृत्रिम ज्वेलरीची मागणी वाढली आहे. गेल्या तीन ते चार वर्षात यात अधिकच वाढ झाली असल्याचे चित्र आहे. त्यात कलर ज्वेलरी ब्राइडल कुंदन, पूल ज्वेलरी, स्टोन ज्वेलरी,अँड ज्वेलरी इत्यादी समावेश आहे.
लग्नात मिरवायला मोत्यांचे दागिने हवेच! पाहा कोणते प्रकार आहेत बाजारात उपलब्ध
अल्प दरात लग्नाचे ड्रेस
गेले 12 वर्षापासून या व्यवसायात आहे. जुनी शुक्रवारी येथे लाहनीज नाट्य शृंगार या नावे आमचे शॉप आहे. त्यामाध्यमातून लोकांची मागणी बघता सर्व प्रकारचे ड्रेस आमच्याकडे उपलब्ध आहेत. त्यात प्रामुख्याने थिमबेस ड्रेस, पार्टी वेयर ड्रेस, लुगडे, लाचां, लेहंगा, मॅटरनिटी स्पेशल गाऊन ड्रेस, ज्यांची किंमत बाजारात 5- पासून ते 15 हजार रुपये पर्यंत असते असे महागडे ड्रेस आमच्याकडे अल्प दरात भाड्याने उपलब्ध आहेत.
पार्सल पाठवण्याचं टेन्शन विसरा! पोस्ट खात्यानं सुरू केली 'वन स्टॉप' सेवा
कृत्रिम ज्वेलरीची मागणी वाढली
लग्नसराईत वापरण्यात येणारे अनेक ड्रेस देखील आमच्याकडे उपलब्ध आहेत. दिवसेंदिवस सोन्याचा वाढता भाव लक्ष्यात घेता अनेक पर्याय उपलब्ध झाले आहे त्यात कृत्रिम ज्वेलरीची मागणी मोठ्या प्रमाणात होत असून आमच्या येथे अनेक प्रकारच्या ब्रायडल डिझायनर ज्वेलरी उपलब्ध आहे. हल्ली कृत्रिम दागिने घालण्याकडे महिलांचा कल वाढला असून त्याची मागणी सर्वाधिक आहे, अशी माहिती सुहासिनी शाहू यानी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.