मुंबई, 3 डिसेंबर : लग्नाचा सिझन सुरू होताच महिलांची पावलं मॅचिंग दागिन्यांच्या खरेदीसाठी दुकानांकडं वळू लागतात. मराठी कुटुंबातील लग्न असेल तर मोत्यांच्या दागिन्यांची हमखास खरेदी केली जाते. मुंबईतील दादरच्या मार्केटमध्ये मोत्यांच्या दागिन्यांचे आकर्षक सेट उपलब्ध आहेत. अतिशय सुंदर आणि शोभिवंत दिसणाऱ्या या दागिन्यांची पाहणाऱ्या प्रत्येकाला भुरळ पडत आहे.
बुगडी
हा एक पारंपरिक दागिना आहे. कानाच्या वरच्या वक्र भागात हा घातला जातो. मुली लग्नाच्या दिवशी सहसा बुगडी घालतात. मोती आणि सोन्याच्या कॉम्बिनेशनमध्ये हा दागिना बनवला जातो.
कुडी
मोत्याच्या मण्यांनी बनवलेला हा मराठी दागिना आहे. कुडी कानात घातली जाते. गोल आणि फुलांसारख्या डिझाईनमध्ये कुड्या बनवल्या जातात. पेशवाईच्या काळात या दागिन्याला महत्त्व होते.
लग्नाची बिनधास्त करा खरेदी, 'इथं' घ्या ईएमआयवर साड्या! पाहा Video
नथ
मोत्याची नथ हा पारंपारिक दागिना लग्नसमारंभात हमखास दिसतो. नथ घालण्याचा ट्रेंड संपला असं आजवर कधीही झालेलं नाही. नऊवारी किंवा काठापदराच्या साडीवर नथ घातली जाते. बानू नथ ते पेशवाई नथ असे अनेक प्रकार बाजारात मिळतात.
तन्मणी हार
हा हार मोत्यांचा बनवलेला असतो आणि तो गळ्यात घालतात. या हारामध्ये मोत्यांच्या सरींसोबतच पेंडेंटसुद्धा घातले जाते. या हारात मोत्यांच्या मण्यांचे तीन ते चार लेयर असतात. बाजारात खूप सुंदर डिझाईन्स आणि पॅटर्नमध्ये हा हार उपलब्ध आहे.
अंगठी
मोत्याची अंगठी बनवताना शक्यतो लहान किंवा मोठ्या आकाराचे मोती निवडले जातात. पुरुष आणि महिला दोघंनाही मोत्याची अंगठी खुलून दिसते. सोनं आणि मोतीच्या कॉम्बिनेशनमध्ये ही अंगठी बनवली जाते.
लग्नामध्ये काढा सोप्या पद्धतीनं सुंदर मेंदी, सर्वांवर पडेल तुमचं इंप्रेशन! Video
मोत्याचा हार
नऊवारी, सहावारी किंवा कोणत्याही प्रकारच्या साडीवर मोत्याचा हार घातला की वेगळाच लुक येतो. मोत्याचा हार एक, दोन किंवा तीन सरींचा असतो. लग्न समारंभामध्ये, खास कार्यक्रमात किंवा अगदी नेहमीच्या वापरातही मोत्याचा हार घातला जातो.
चोकर
सध्या चोकरचा चांगलाच ट्रेंड आहे. मोत्यांमध्ये अनेक प्रकारची डिझाइनर चोकर तुम्हाला बाजारात बघायला मिळतील. मोत्यांचा चोकर हा दिसायला खूप अप्रतिम दिसतो. काठापदराच्या साडीवर शिवाय मॉडर्न कपड्यांवरही तुम्ही चोकर घालू शकता. . गळ्याला अगदी फिट पद्धतीने चोकर घातला जातो.
चिंचपेटी
चिंचपेटी हा मोत्याचा दागिना गळ्यात घातला जातो. चिंचपेटी हार शक्यतो नऊवारी साडीवर घालतात.
करा हो लगीनघाई! 2023 सालातील लग्नाचे सर्व शुभ मुहूर्त एका क्लिकवर
बांगडी
मोत्याच्या बांगड्या या प्राचीन काळापासून वापरल्या जातात. मोत्याच्या बांगड्या या शक्यतो हिरव्या बांगड्या सोबत घातल्या जातात. विविध डिझाईनच्या मोती बांगड्यांचा सेट बाजारात उपलब्ध आहे.
बाजूबंद
बाजूबंद हा दंडामध्ये घालण्याचा दागिना आहे. मोत्यांचा वापर करून यात नक्षीकाम केलेली असते. मोत्यासह यामध्ये माणिक किंवा इतर स्टोन्स देखील वापरलेले असतात.
यावर्षी मोत्याच्या दागिन्यांना मागणी वाढली आहे तसंच मोत्यांचे पारंपारिक महाराष्ट्रीयन दागिने दादर मार्केट मध्ये उपलब्ध आहेत. लोक राजेशाही थाट दाखवणाऱ्या मोत्यांच्या दागिन्यांना अधिक पसंती देतात. 350 रुपये ते 5000 रुपयां पर्यंत अनेक दागिने उपलब्ध आहेत. तसेच 5 वर्ष मोत्याच्या दागिन्यांची गॅरंटी आहे. मोती खराब झाल्यास आम्ही पूर्ण दागिना बदलून देतो, अशी माहिती महाराणी ज्वेलरी शॉपच्या कृष्णा पटवा यांनी दिली.
गुगल मॅपवरून साभार
महाराणी ज्वेलर्सचा पत्ता
दुकान नंबर 16, सी किर्तीकर मार्केट, तिसरी लेन, डॉ. डिसल्वा रोड, दादर (पश्चिम), मुंबई - 400028,
फोन नंबर - 9137250329
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.