मुंबई, 15 मार्च : राज्यात शेतकऱ्यांना सुलतानी संकटाला सामोरे जात असतानाच आता अस्मानी संकटाला सामोरे जावे लागणार आहे. मागच्या काही दिवसांत खराब हवामानामुळे शेतकरी संकटात सापडत चालला आहे. कधी हवेत गारवा तर कधी उन्हाचा तडाखा बसत असल्याने पिके वाळून जात होती. तर अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
दरम्यान नागपूर जिल्ह्यात पाऊस झाला आहे. पावसासह गारपीट झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 13 मार्चनंतर राज्यात जिल्ह्यात पुन्हा पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
सावधान! 'या' प्रकारचा कापूस घेऊ नका, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना गंभीर इशारा! पाहा Video
देशभरात शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची काढणी सुरू केली आहे. मात्र हवामानातील बदलामुळे शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे. रविवार, सोमवार व मंगळवारी झालेल्या पावसाने व गारपिटीमुळे अनेक गावांमध्ये रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे.
मार्चमध्ये पहिल्यांदाच उष्णतेचा प्रभाव दिसून येत आहे. राज्यात पाऊस आणि गारपिटीनंतर आर्द्रता वाढली आहे. दिवसभरात तापमान 30 अंश सेल्सिअस असते. रात्री तापमान 14-15 अंश सेल्सिअस राहते. अशा परिस्थितीत लोकांना दिवसा घाम फुटतो. तर रात्री थंडीचा सामना करावा लागत आहे.
हवामान विभागाच्या मते, पुढच्या दोन दिवसांत नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार झाला आहे. यामुळे राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याची हवामान विभागाने माहिती दिली आहे.
पुढच्या दोन दिवसांत काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता आहे. देशभरात काही ठिकाणी उष्मा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान कोकण परिसरात दमट वातावरण असल्याने तापमान 35° च्या पुढे गेले आहे.
ढगाळ हवामानात कशी घेणार पिकांची काळजी? कृषी विभागानं दिला महत्त्वाचा सल्ला
पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे उत्तर बिहारपासून छत्तीसगड, विदर्भ, तेलंगणा ते कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झाल्याने आजपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर आज उत्तर महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Weather, Weather Update, Weather Warnings