मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

प्रेयसीने गर्भवती असल्याचं सांगताच तरुणाला बसला धक्का, सेल्फी पाठवून घडलं भयंकर!

प्रेयसीने गर्भवती असल्याचं सांगताच तरुणाला बसला धक्का, सेल्फी पाठवून घडलं भयंकर!

  प्रेयसी खरंच गर्भवती होती की तिने फक्त मृत तरुणाची मस्करी केली होती, याबाबत पोलिसांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.

प्रेयसी खरंच गर्भवती होती की तिने फक्त मृत तरुणाची मस्करी केली होती, याबाबत पोलिसांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.

प्रेयसी खरंच गर्भवती होती की तिने फक्त मृत तरुणाची मस्करी केली होती, याबाबत पोलिसांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Madhawgdha, India

 भोपाळ, 30 नोव्हेंबर :  प्रेयसीनं गर्भवती असल्याचं सांगताच एका तरुणानं जीव दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या तरुणानं आत्महत्येपूर्वी प्रेयसीला सेल्फी पाठवला आणि नंतर दुपट्ट्याने गळफास घेत जीवन संपवलं. ही घटना मध्य प्रदेशमधील रीवा जिल्ह्यातील संजय नगर परिसरात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  तरुण प्रेयसीशी व्हॉट्सअप कॉलवर बोलत होता तेव्हाच तिने गर्भवती असल्याचं सांगितलं आणि भीतीपोटी तरुणाने आत्महत्या केली. तरुणाचं नाव विनय कुमार द्विवेदी (वय 29) होतं. तो अतरैलाचा होता, पण संजय नगरमध्ये भाड्याने राहायचा. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यावेळी विनय गळफास घेतलेल्या अवस्थेत होता, तर त्याचा फोन अंथरुणावर पडून होता.

दरम्यान, पोलीस तपासात असं आढळून आलं की, तरुणाने मृत्यूपूर्वी आत्महत्येचा फोटो प्रेयसीला पाठवला होता. घटनेच्या रात्री तरुणीने तरुणाला तिच्या गरोदरपणाची माहिती दिली होती. यामुळे तरुण अस्वस्थ झाला. यानंतर त्याने आत्महत्या करण्याचा विचार केला. जप्त केलेल्या फोनमध्ये पोलिसांना अनेक संशयास्पद गोष्टी सापडल्या आहेत.

(मोठी बातमी! श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबवर हल्ला)

विनय हा विद्युत विभागाच्या सब स्टेशनमध्ये मेंटेनन्सचं काम करायचा. रविवारी त्याने काम संपवून मित्राच्या घरी जेवायला जाणार असल्याचं सांगितलं होतं. तसेच तो रात्री भाड्याच्या घरात राहणार होता. मात्र, सकाळी त्याचा मृत्यू झाल्याचं आम्हाला कळालं, असं त्याच्या नातेवाईकांनी सांगितलं.

माहितीनुसार, प्रेयसीशी बोलल्यानंतर काही वेळाने तरुणाने गळफास लावून तिला आत्महत्येपूर्वीचा सेल्फी पाठवला होता. सोमवारी बराच वेळ तरुणाने रुमचा दरवाजा न उघडल्याने घरमालकाने नातेवाईक आणि पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून पोस्ट मॉर्टेमसाठी संजय गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये पाठवला. यानंतर मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यात आला.

(तिच्यामुळे जेलमध्ये गेला अन् जामिनावर बाहेर येताच तिलाच घेऊन पळून गेला)

या प्रकरणी तपासासाठी पोलीस सायबर सेलची मदत घेत आहेत. मृताच्या मोबाईलचा डेटा तपासला जात आहे. तसंच, मृताच्या नातेवाईकांची चौकशी सुरू आहे. तपासात प्रेयसीची भूमिका संशयास्पद आढळल्यास तिच्यावर कारवाई केली जाईल,” अशी माहिती समान पोलीस ठाण्याचे स्टेशन प्रभारी सुनील गुप्ता यांनी दिली.

दरम्यान, प्रेयसी खरंच गर्भवती होती की तिने फक्त मृत तरुणाची मस्करी केली होती, याबाबत पोलिसांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. तसंच तिने फोटो पाहूनही कुणालाच का कळवलं नाही, असाही प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळे या प्रकरणाचा मृताच्या फोनमधील डेटाच्या आधारे तपास सुरू आहे.

First published: