नागपूर, 10 मे : नागपूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. आई वडिलांच्या भांडणाची शिक्षा दोन अल्पवयीन मुलांना मिळालीये. घडलेल्या धक्कादायक प्रकारानं नागपूर हादरलं आहे. आई -वडिलांमध्ये सतत भांडण होत होती. या भांडणाला कंटाळून अल्पवयीन मुलांनी टोकाचं पाऊल उचलल्याच्या दोन घटना शहरातून समोर आल्या आहेत. पहिल्या घटनेत एका 15 वर्षीय मुलानं तर दुसऱ्या घटनेत एका 16 वर्षीय मुलीनं आत्महत्या केली आहे. आई-वडिलांमध्ये सतत होत असलेल्या भांडणाला कंटाळून या मुलांनी आत्महत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. भांडणाला कंटाळून आत्महत्या घटनेबाबत अधिक माहिती अशी की आई-वडिलांमध्ये सतत होत असलेल्या भांडणाला कंटाळून अल्पवयीन मुलांनी जीवन संपवलेल्या दोन घटना नागपुरातून समोर आल्या आहेत. यामध्ये एका 15 वर्षीय मुलानं तर दुसऱ्या घटनेमध्ये 16 वर्षीय मुलीनं आत्महत्या केली आहे. पांढरबोडी भागात विनय मसराम या मुलानं आपलं आयुष्य संपवलं आहे. तर दुसऱ्या घटनेत अजनी भागात नंदिनी गोरे या 16 वर्षीय मुलीनं आत्महत्या केली आहे. आई वडिलांच्या सततच्या भांडणामुळं आत्महत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







