नागपूर, 11 डिसेंबर : ‘20 वर्षांआधी आम्ही स्वप्न पाहिलं होतं. पण तुम्ही नसता तर हे स्वप्न पूर्ण झालं नसतं. तुम्ही ताकद दिली म्हणून हा महामार्ग होऊ शकला आहे, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपूरमध्ये समृद्धी महामार्गच्या पहिल्या टप्प्याचं आणि मेट्रो प्रकल्प, एम्सच्या लोकार्पणाचा सोहळा संपन्न झाला. समृद्धी महामार्गाचा लोकार्पण सोहळा संपन्न सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. (जळगाव दूध संघाच्या निवडणुकीत खडसेंना मोठा धक्का, भाजपने मारली बाजी) ‘समृद्धी महामार्गाचे काम सुरू केले तेव्हा माझ्यासोबत एकनाथ शिंदे होते. सर्व विरोधी पक्ष, पत्रकारांना विचारणा केली. आम्ही याची सुरुवात केली. भूमी अधिग्रहणाचा मुद्दा होता. त्यावेळी कुणीही पैसे द्यायला नव्हते. बँक पैसे द्यायला तयार नव्हते. महाराष्ट्र सरकारमध्ये काही अशी मुलं आहे, ज्यांच्याकडे खूप पैसे आहे, एमएमआरडीए आहे, सिडको आहे, आम्ही त्यांना सांगितलं मुंबईत पैसे कमावून मुंबईला लावू नका, विदर्भाला पैसे लावा असं सांगितलं आणि पैसे उधार घेऊन शेतकऱ्यांच्या जमिनीचे अधीग्रहण केलं, खुद्द एकनाथ शिंदे यांनी जाऊन शेतकऱ्यांच्या सह्या घेतल्या. कारण त्यावेळी ते ज्या पक्षात होते, त्यांचीच लोक गावामध्ये जाऊन विरोध करत होते. पण लोकांनी आम्हाला एक एक इंच जमीन दिली, असंही फडणवीस म्हणाले. (जळगाव दूध संघाच्या निवडणुकीत खडसेंना मोठा धक्का, भाजपने मारली बाजी) आम्ही नवीन मॉडेल तयार केले, सगळ्या बँकांना बोलावलं, एसबीआय बँकेनं आता पैसे दिले. त्यानंतर या महामार्गाला एक रुपयाची कमी पडली नाही. आगामी काळात 50 हजार कोटी रुपये महसूल देईल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला. याच मार्गावर सेमी हायस्पीड कार्गो रेल्वे चालू करण्याचा आमचा विचार आहे. यासाठी जागा सुद्धा पाहिली आहे. सीएनजी गॅस पाइपलाईनचा विचारही केला आहे. येणाऱ्या काळात याचा फायदा सगळ्यांना होईल. आगामी काळात नागपूर विमानतळाचे ही भूमिपूजन होणार आहे, असंही फडणवीस म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.