मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /प्रवाशांचे प्राण वाचवताना बस चालकाचा गेला जीव; ST कर्मचाऱ्यांचा आगार प्रमुखांवर गंभीर आरोप

प्रवाशांचे प्राण वाचवताना बस चालकाचा गेला जीव; ST कर्मचाऱ्यांचा आगार प्रमुखांवर गंभीर आरोप

एसटी महामंडळाच्या नादुरुस्त बस वाहक चालकांच्या जीवावर उठल्या आहे.

एसटी महामंडळाच्या नादुरुस्त बस वाहक चालकांच्या जीवावर उठल्या आहे.

एसटी महामंडळाच्या नादुरुस्त बस वाहक चालकांच्या जीवावर उठल्या आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Wardha, India

नरेंद्र मते, प्रतिनिधी

वर्धा, 8 जानेवारी : राज्यात दिवसेंदिवस अपघात होत आहेत. त्यातच आता आणखी एक दुर्घटना समोर आली आहे. प्रवाशांचे प्राण वाचविताना बसचालक स्वतः चा जीव गमावून बसला. बसचे ब्रेक लागत नसल्याने चालकाने बस दुभाजकावर चढवली. यानंतर झालेल्या अपघातात बस चालकाचा मृत्यू झाला. यामुळे नादुरुस्त बसगाड्या चालक वाहकांच्या जीवावर उठल्याचे उदाहरण समोर आले आहे. दरम्यान, या घटनेनंतर संतप्त कर्मचाऱ्यांनी आगार प्रमुखांना घेराव घातला होता.

चालकांनी केला हा आरोप - 

एसटी महामंडळाच्या नादुरुस्त बस वाहक चालकांच्या जीवावर उठल्या आहे. अशाच ब्रेक फेल झालेल्या बसला अपघात झालाय. वर्धा आजाराच्या चालकाने 26 प्रवाशांचा जीव वाचविण्यासाठी बस दुभाजकावर चढविली. हा अपघात बुट्टीबोरी जवळ ट्रकला वाचविण्याच्या प्रयत्नात झाला. सुदैवाने या अपघातात नागरिकांची कोणतीही जीवित हानी झाली नाही. यात नादुरुस्त गाड्या तशाच प्रवासांसाठी पाठवत असल्याने असले अपघात होत असल्याचे येथील काही बस चालकांनी सांगितले.

प्रवाशांचा जीव वाचवत असतानाच मात्र यात बस चालकाचा मृत्यू झाला. याचा रोष व्यक्त करण्यासाठी रामनगर आगारात एसटी चालक, वाहकांनी एकत्र येत रोष व्यक्त केला. यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे शिवशाही बसचे प्रशिक्षण नसेल तर ती बस चालकाकडे देण्यात येत नाही. पण शिवशाही बसचे चालकाला प्रशिक्षण न देताच ही बस प्रवासाकरिता पाठवण्यात आली.

हेही वाचा - Shocking: रस्ते अपघाताचे 5 असे व्हिडीओ, जे पाहून तुम्हाला झोप लागणार नाही

रस्त्यावरुन चालताना किंवा गाडी चालवताना सगळीकडे लक्ष असणं गरजेचं आहे. कारण इथे कधी काय होईल हे सांगणं कठीण आहे. अनेकदा लोकांची स्वत:ची चुक नसताना दुसऱ्यांच्या चुकीमुळे अनेक लोक जखमी झाले आहेत. तसेच अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे. सोशल मीडियावर आपल्याला या संबंधीत काही असे व्हिडीओ पाहायला मिळतात जे आपल्यासमोर उदाहरण म्हणून समोर येतात.

First published:

Tags: Road accident, St bus accident, Wardha, Wardha news