मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /नागपूरच्या हॉटेलमध्ये सुरू होता सेक्स रॅकेट; पोलिसांची मोठी कारवाई

नागपूरच्या हॉटेलमध्ये सुरू होता सेक्स रॅकेट; पोलिसांची मोठी कारवाई

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

रोशन हा परराज्यातील गरीब मुलींना आपल्या जाळ्यात ओढायचा. तसेच यानंतर त्यांना पैशांचे आमिष दाखवत त्यांच्याकडून देहव्यापार करवून घ्यायचा.

नागपूर, 21 जुलै : नागपुरातून पोलिसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. परराज्यातील मुलींना पैशांचे आमिष दाखवत त्यांच्याकडून देहव्यापार करविणाऱ्या सेक्स रॅकेटचा भंडाफोड करण्यात आला आहे. ही कारवाई नागपूर पोलीस गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

पोलीस पथकाने सापळा रचला आणि गड्डीगोदाम येथील ‘ओयो टाऊन हाऊस हॉटेल’ येथे कारवाई कर एका पीडित मुलीची सुटका केली. पोलिसांनी आपल्या कारवाईत सूत्रधार रोशन ऊर्फ सलमान राजेश डोंगरे (33, अंबाझरी हिल टॉप, पांढराबोडी) याला ताब्यात घेण्यात आले आहे. ‘ओयो टाऊन हाऊस हॉटेल’ येथे देहव्यापार चालवला जातो, अशी टीप पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला आणि बनावट ग्राहक पाठविला. ग्राहकाने रोशनशी मुलीचा सौदा केला. यानंतर त्याने इशारा दिल्यावर पोलिसांनी याठिकाणी छापा टाकला.

पोलिसांनी केलेल्या या कारवाईत आरोपी रोशन ऊर्फ सलमान राजेश डोंगरे याला अटक केली आहे. आरोपी रोशन हा परराज्यातील गरीब मुलींना आपल्या जाळ्यात ओढायचा. तसेच यानंतर त्यांना पैशांचे आमिष दाखवत त्यांच्याकडून देहव्यापार करवून घ्यायचा. याप्रकरणी त्याच्याविरोधात सदर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हेही वाचा - पर्सनल डायरी काका-काकूने वाचली, अन् नागपुरातील उच्चशिक्षित तरुणीचं टोकाचं पाऊल

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदा मनगटे, संतोष जाधव, अनिल अंबाडे, संदीप चंगोले, भूषण झाडे, मनिष रामटेके, अश्विन मांगे, समीर शेख, रिना जाऊळकर यांच्या पथकाने केली.

First published:

Tags: Crime news, Nagpur News, Sex racket