मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पुतीन आणि बायडेन उद्धव ठाकरेंविषयी चर्चा करतात पण मोदी.., राऊतांचा मोठा दावा

पुतीन आणि बायडेन उद्धव ठाकरेंविषयी चर्चा करतात पण मोदी.., राऊतांचा मोठा दावा

"पुतीन, बायडेन आणि किंग चार्ल्स उद्धव ठाकरेंबद्दल विचारत आहेत;" संजय राऊतांचं विधान चर्चेत

"पुतीन, बायडेन आणि किंग चार्ल्स उद्धव ठाकरेंबद्दल विचारत आहेत;" संजय राऊतांचं विधान चर्चेत

राज्याचं हिवाळी अधिवेशन सध्या उपराजधानी नागपुरात सुरू आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत आहेत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Nagpur, India

मुंबई, 29 डिसेंबर : राज्याचं हिवाळी अधिवेशन सध्या उपराजधानी नागपुरात सुरू आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत आहेत. अशातच राज्यात सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचे विधान जोरदार चर्चेत आहे. नागपुरातील एका कार्यक्रमात संजय राऊत म्हणाले की, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन, अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन आणि ब्रिटनचे किंग चार्ल्स महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल चर्चा करत आहेत. तिघांनीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करून चर्चा केली होती, त्यात उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे सरकारच्या विरोधात कसे लढत आहेत? याबद्दल त्यांनी चर्चा केल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. या संदर्भात ‘टीव्ही 9 हिंदी’ने वृत्त दिलंय.

युक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमीर झेलेन्स्की यांनीही उद्धव ठाकरेंबद्दल माहिती घेतल्याचा दावा राऊतांनी केलाय. संजय राऊत म्हणाले की, पुतीन, बायडेन आणि किंग चार्ल्स या तिघांनीही विचार केला की, पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरे यांची कधीच ओळख कशी करून दिली नाही? मात्र, संजय राऊतांचं हे विधान एकनाथ शिंदे यांच्या आधीच्या विधानाची खिल्ली उडवणारं होतं. ज्यात बिल क्लिंटन यांनी आपली चौकशी केल्याचा दावा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता.

हे ही वाचा : सिद्धिविनायक मंदिराचा मुद्दा आता थेट अधिवेशनात; बांदेकरांच्या अडचणी वाढणार?

नागपुरातील एका कार्यक्रमात एकनाथ शिंदे म्हणाले, “काही महिन्यांपूर्वी बिल क्लिंटन यांच्यासोबत राहणारा एक भारतीय माझ्याकडे आला होता. त्यांनी मला सांगितले की बिल क्लिंटन यांनी त्यांना विचारले की एकनाथ शिंदे कोण आहेत? एकनाथ शिंदे किती काम करतात, कधी खातात, कधी झोपतात? असं बिल क्लिंटन यांनी त्या व्यक्तीला विचारल्याचा दावा एकनाथ शिंदेंनी केला होता.

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटात सुरू असलेल्या वादादरम्यान, महाराष्ट्र कर्नाटकसोबत सीमा प्रश्नावरही राजकारण तापलंय. त्याचवेळी संजय राऊत यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर भाजपा कार्यकर्ते संजय राऊत यांच्या कॉमिक सेन्सचं कौतुक करत आहेत. काही नेत्यांनी ट्विट करून विचारलं की, "कोणाचा कॉमिक सेन्स चांगला आहे, राहुल गांधी की संजय राऊत?" असं म्हणत उद्धव ठाकरेंवर टीका करणारे समित ठक्कर यांनी व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे.

हे ही वाचा : लवासाप्रकरणात पुन्हा न्यायालयात याचिका; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले पवार कुटुंबावर...

भाजपच्या प्रीती गांधी यांनी ट्विट केलं की, "द कपिल शर्मा शोला काही प्रतिस्पर्धी आहेत." दरम्यान, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांच्या विरोधात विरोधकांनी आंदोलन केल्याने महाराष्ट्र विधानसभेत गदारोळ झाला. वाशिम येथील एका व्यक्तीला गावांतील 37 एकर जमीन हस्तांतरित केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने नोटीस बजावल्यामुळे कृषिमंत्री अब्दुल सत्तार चांगलेच चर्चेत आले आहेत. मंत्री संजय राठोड यांच्यावरही असेच आरोप झाले आहेत.

First published:
top videos

    Tags: Cm eknath shinde, Sanjay Raut (Politician), Uddhav Thackeray (Politician)