Home /News /maharashtra /

Nagpur Crime : आजोबाने नातीसोबत केलं 'हे' घृणास्पद कृत्य, पीडितेच्या आईने पाहिलं 'या' अवस्थेत

Nagpur Crime : आजोबाने नातीसोबत केलं 'हे' घृणास्पद कृत्य, पीडितेच्या आईने पाहिलं 'या' अवस्थेत

फोटो क्रेडिट - सोशल मीडिया

फोटो क्रेडिट - सोशल मीडिया

पीडित मुलीची आई गर्भवती (Pregnant) होती. यामुळे ती एप्रिल 2021मध्ये आपल्या माहेरी वडिलांच्या घरी प्रसूतीसाठी आली होती.

    नागपूर, 7 जून : राज्यात गेल्या काही दिवसांत अत्याचार, बलात्काराच्या (Physical Abused) घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसत आहे. प्रत्येक दिवशी कुठे ना कुठे या घटना घडत आहेत. यातच आता नात आणि आजोबा या नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना घडली. ही घटना क्राईम सिटी नागपूर (Nagpur Crime News) येथे घडली. काय आहे घटना - एका 62 वर्षीय आजोबाने आपल्या नातीवरच डोळा ठेवत तिला वासनेची शिकार बनवल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. (Physical Abused with Grand daughter) ही घटना नागपूर शहरातील कपील नगर पोलीस ठाणे (Kapil Nagar Police Station) परिसरात घडली. पीडित नातीचे वय 13 वर्ष इतके आहे. रेल्वेतून निवृत्त झालेल्या या नराधम आजोबाने आपल्या नातीसोबत शारिरीक संबंध ठेवले. कपील नगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. आईने पाहिले आक्षेपार्ह अवस्थेत अन्... पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची आई गर्भवती (Pregnant) होती. यामुळे ती एप्रिल 2021मध्ये आपल्या माहेरी वडिलांच्या घरी प्रसूतीसाठी आली होती. गर्भवती असल्यामुळे तिची आई आपल्या मुलीला आजोबाजवळ राहण्यासाठी पाठवत होती. काही दिवसांपूर्वी आईने मुलीला त्यांच्यासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिले. त्यानंतर आईने मुलीला विश्वासात घेऊन चौकशी केली असता मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी आजोबाला अटक केली. पीडिता सर्व भावंडामध्ये मोठी असून तिला आई, वडील, एक भाऊ, एक बहीण आहे. तिचे वडील खासगी काम करतात. तर, आई गृहिणी आहे. गेल्या वर्षापासून पीडितेचे आई-वडील आणि सर्व कुटुंब आईच्या माहेरी राहायला गेले आहे. घरातील सर्वच झोपले असताना एका रात्री पीडितेच्या आईला जाग आली. तिने पाहिले की, तिच्या शेजारी झोपलेली पीडिता ही त्याठिकाणी नव्हती. यानंतर तिने ती कुठे गेली हे पाहण्यासाठी घरातील हॉलमध्ये जाऊन पाहिले. यावेळी तिला जे काही दिसले, ते पाहून तिच्या पायाखालची जमिनच सरकली. तिला तिची मुलगी आणि आजोबा आक्षेपार्ह अवस्थेत दिसून आले. यानंतर तिने आजोबांना हटकले आणि नराधम आजोबाची चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे तिने पीडितेला विश्वासात घेत तिची चौकशी केली असता तिने सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. हेही वाचा - लग्नानंतर 5 महिन्यांत संपवलं आयुष्य, नवविवाहित जोडप्याची 'या' काळजीनं आत्महत्या अनेकदा केले नातीसोबत दुष्कृत्य -  पीडितेने सांगितले की, 13 एप्रिल 2021 रोजी घरी आजोबा आणि पीडिता हे दोनच जण घरी होते. या दिवशी या नराधम आजोबाचा डोळा आपल्या नातीवर पडला आणि त्याने तिच्या एकटेपणाचा फायदा घेतला. तसेच तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. इतकेच नव्हे तर याबाबत कुणाला सांगितले तर घरातून हाकलून लावीन, अशी धमकीही दिली. यानंतर आजोबांनी सतत तिच्यासोबत अनेकदा शारीरिक संबंध ठेवत दुष्कृत्य केल्याचे सांगितले. अखेर पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी कपील नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर आरोनी नराधमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Nagpur News

    पुढील बातम्या