मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /लग्नानंतर 5 महिन्यांत संपवलं आयुष्य, नवविवाहित जोडप्याची 'या' काळजीनं आत्महत्या

लग्नानंतर 5 महिन्यांत संपवलं आयुष्य, नवविवाहित जोडप्याची 'या' काळजीनं आत्महत्या

लग्नानंतरचं पहिलं वर्ष प्रत्येक नवविवाहित जोडप्यासाठी (Newly wed couple) खास असतं. या जोडप्यानं लग्नानंतर पाच महिन्यांमध्येच आत्महत्या केली आहे.

लग्नानंतरचं पहिलं वर्ष प्रत्येक नवविवाहित जोडप्यासाठी (Newly wed couple) खास असतं. या जोडप्यानं लग्नानंतर पाच महिन्यांमध्येच आत्महत्या केली आहे.

लग्नानंतरचं पहिलं वर्ष प्रत्येक नवविवाहित जोडप्यासाठी (Newly wed couple) खास असतं. या जोडप्यानं लग्नानंतर पाच महिन्यांमध्येच आत्महत्या केली आहे.

    मुंबई, 7 जून : लग्नानंतरचं पहिलं वर्ष प्रत्येक नवविवाहित जोडप्यासाठी  (Newly wed couple)  खास असतं. या काळात ते आपलं नातं फुलवण्याचा आणि एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, चेन्नईतील एका जोडप्याच्या बाबतीत (Chennai Couple) असं काहीही घडलं नाही. लग्नानंतर पाच महिन्यांतच त्यांनी आयुष्य संपवलं.

    काय आहे प्रकरण?

    चेन्नईतील (Chennai) मदुरावायलमध्ये (Maduravoyal) राहणाऱ्या एका जोडप्याने लग्नाच्या पाच महिन्यांनंतर आत्महत्या (Couple Suicide) केली. घरातील पंख्याला गळफास घेऊन या पती-पत्नीने आपला जीव दिला. मूल जन्माला घालू शकत नसल्यामुळे (Impotence) त्यांनी हे पाऊल उचलले. नवऱ्याचं लिंग फ्रॅक्चर (Penile Fracture) झाल्यामुळे मूल होऊ शकत नाही, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. घरामध्ये सापडलेल्या चिठ्ठीवरून ही बाब उघड झाली आहे.

    थुथुकुडी येथील मूळ रहिवासी असलेला 22 वर्षीय तरुण चेन्नईतील मदुरावायलच्या जवळ असलेल्या आलापक्कम येथे राहत होता. त्याचे भंगार वस्तूंच्या (Scrap Metal Shop) खरेदी-विक्रीचे दुकान होते. या वर्षी (2022) जानेवारी महिन्यात घरच्यांच्या संमतीने एका 20 वर्षीय तरुणीशी त्याचं लग्न झालं होतं. लग्नानंतर हे जोडपं आलापक्कम येथे राहत होतं.

    या जोडप्याला भेटण्यासाठी आलेल्या नातेवाईकांनी फोनवरून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. शिवाय भंगारचं दुकानही बंद असल्याचं त्यांना समजलं. दरम्यान, बराच वेळ दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांनी मदुरावायल पोलिसांना (Maduravoyal Police) माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा तोडला असता हे जोडपे पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसलं.

    पाच वर्षांच्या रिलेशिपनंतर प्रियकराने दिला लग्नाला नकार; वाचा, प्रेयसीने पुढे काय केलं?

    टोकाचा निर्णय का घेतला?

    यानंतर दोघांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी (Autopsy) किलपाक सरकारी रुग्णालयात (Kilpauk Government Hospital) पाठवण्यात आले. घराच्या झडती दरम्यान जोडप्यानं आत्महत्येपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली. या चिठ्ठीवर दोघांचीही स्वाक्षरी होती. 'पेनायल फ्रॅक्चरमुळे आम्हाला मूल होऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही आमचं जीवन संपवत आहोत. आमच्या निर्णयासाठी इतर कोणीही जबाबदार नाही,' असं या पत्रात म्हटलं आहे.

    या प्रकरणातील  तपासात समोर आलेल्या माहिती नुसार, या जोडप्यानं या समस्येबद्दल डॉक्टरांशी सल्लामसलत केली नव्हती. तरीदेखील आपल्याला मूल होणार नाही याची चिंता त्यांना होती. या चिंतेतून त्यांनी गळफास घेतला. ही गोष्ट नक्कीच धक्कादायक आहे. डॉक्टरांचा सल्ला घेतला नसतानाही त्यांना मूल होणार नाही याबाबत खात्री कशी होती, याचा तपास पोलीस करत आहेत.

    First published:
    top videos

      Tags: Chennai, Crime news, Sucide case, Wedding couple