नागपूर, 15 मार्च : कोरोनाची लाट ओसरल्यानंतर आता राज्यात नवं संकट येऊन उभं ठाकलं आहे. अहमदनगर पाठोपाठ नागपुरात H3N2 व्हायरसचा दुसरा बळी ठरला आहे. इन्फ्लूएंझा H3N2 ची लागण झालेल्या एका 78 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.
कोरोना महामारीनंतर एच 3एन 2 इन्फ्युएन्झा व्हायरस धुमाकूळ घातला आहे. देशभरात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. महाराष्ट्रात पुण्यानंतर नागपुरातही रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. अशातच एका खासगी रुग्णालयामध्ये एका 78 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या रुग्णाला मधुमेहासह इतर उच्चरक्तदाबाचा त्रास होता.
(जगातील तिसरा सर्वात घातक आजार आहे ब्रेन स्ट्रोक! जाणून घ्या याचे प्रकार आणि लक्षणं)
या रुग्णाची H3N2 तपासणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. या व्हायरसमुळे रुग्णाचा बळी गेल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाने डेथ ऑडिट झाल्यानंतरच मृत्यूची नोंद H3N2 चा मृत्यू म्हणून करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
कोरोनासह H3N2 बाधित रुग्णाचा नगरमध्ये मृत्यू
दरम्यान, देशात नव्याने आढळलेल्या H3N2 व्हायरससह कोरोनाची लागण झालेल्या अहमदनगरमधील एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या रुग्णाचे नमुने तपासणीसाठी पुढे पाठवण्यात आले आहे.
(त्वचेच्या समस्यांपासून नैराश्यापर्यंत अनेक त्रासांवर उपाय आहे गुलाबजल! फायदे वाचून थक्क व्हाल)
हा रुग्ण मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी होता. त्याच्यावर एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या रुग्णाला कोरोनाची लागण झाली होती. त्याच्या संपर्कात आलेल्या 19 जणांचे नमुने तपासणीसााठी पाठवण्यात आले आहे. हा तरुण बाहेर फिरायला गेला होता. त्यानंतर त्यांची तपासणी केली असता H3N2 बाधित असल्याचे निष्पन्न झाले होते.
मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरागे यांनी याला दुजोरा दिला आहे. महाराष्ट्रात पहिल्यादांचा H3N2 मुळे रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.