मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /अखेर नाशिक पदवीधर निवडणुकीत भाजपचा उमेदावर ठरला; बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

अखेर नाशिक पदवीधर निवडणुकीत भाजपचा उमेदावर ठरला; बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

नाशिक पदवीधर निवडणुकीत भाजपचा उमेदावर ठरला

नाशिक पदवीधर निवडणुकीत भाजपचा उमेदावर ठरला

काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना भाजपचा पाठिंबा मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत बावनकुळे यांनी दिले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India

नागपूर, 27 जानेवारी : नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आलाय. काँग्रेससोबत दगाफटका केलेले अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना भाजपचा पाठिंबा मिळणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूरमध्ये बोलत असताना स्पष्ट संकेत दिले आहेत. याआधी नाशिकच्या जिल्हाध्यक्षांशी यासंदर्भात चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नाशिक दौरा आहे. या दौऱ्यात भाजप अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.

..तर सत्यजित तांबे यांना पाठिंबा : चंद्रशेखर बावनकुळे

नाशिकमधील भाजपच्या स्थानिक नेत्यांनी सत्यजित तांबे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असेल तर त्याला माझा ना नसेल, भाजपची मत विभाजित होणार नाही ती एकालाच मिळेल. त्यामुळे भाजपची मत निर्णायक ठरतील, असं मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी न्युज 18 लोकमत सोबत बोलताना सांगितलं. त्यामुळे सत्यजित तांबे यांना भाजप पाठिंबा देईल, असे स्पष्ट संकेत आता भाजपकडून मिळाले आहेत. या संदर्भात स्थानिक नेते हे बैठक घेऊन कोणत्या अपक्षाला मतदान करायचा याचा निर्णय घेईल, आम्ही अपक्षाला मतदान करणार असा निर्णय भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून घेतला आहे. मात्र, शुभांगी पाटील यांना मतदान करणार नाही, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

वाचा - 'पहाटेचा शपथविधी हा..' अजित पवारांनी सांगितलं षडयंत्राच्या वावड्यामागचं खरं कारण

बाळासाहेब थोरांतांच्या अडचणीत वाढ?

सत्यजित तांबे हे काँग्रेस नेते डॉ. सुधीर तांबे यांचे पुत्र आहेत. तर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. सत्यजित तांबे हेदेखील काँग्रेसचे युवा नेते म्हणून प्रसिद्ध होते. पण नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ऐनवेळी तांबे पिता-पुत्रांनी वेगळा निर्णय घेतला. महाविकास आघाडीतर्फे डॉ. सुधीर तांबे यांना एबी फॉर्म देण्यात आला होता. पण डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यास नकार दिला. तर सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. तांबे यांच्या या निर्णयामागे भाजपची खेळी असल्याचं म्हटलं जात होतं. देवेंद्र फडणवीस यांच्या सूचक वक्तव्याचाही दुजोरा दिला जात होता. मात्र, अद्यापपर्यंत भाजपने त्यांना उघडपणे पाठिंबा दिला नव्हता.

First published:

Tags: Devendra Fadnavis, Nagpur, Satyajit tambe