जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Nagpur News: 'या' शाळेत आहेत 70 वर्षांचे विद्यार्थी, नुकतेच काही जण झाले दहावी पास!

Nagpur News: 'या' शाळेत आहेत 70 वर्षांचे विद्यार्थी, नुकतेच काही जण झाले दहावी पास!

Nagpur News: 'या' शाळेत आहेत 70 वर्षांचे विद्यार्थी, नुकतेच काही जण झाले दहावी पास!

नागपूर जिल्हा परिषदेच्या प्रौढ शिक्षण अभियानातून प्रौढ शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. अनेकांनी वयाच्या सत्तरीत दहावीची परीक्षा दिलीय.

  • -MIN READ Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

नागपूर, 29 जून: शिक्षणाला वय, काळाचे कोणतेही बंधन नसते. माणूस कोणत्याही वयात आपले शिक्षण पूर्ण करू शकतो. त्यासाठी फक्त शिकण्याची इच्छा पाहिजे. हीच इच्छा असणाऱ्या आणि परिस्थितीमुळे शिक्षण पूर्ण करू न शकलेल्यांना नागपूर जिल्हा परिषदेने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. नवी किरण अंतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनेकांनी प्रौढ शिक्षणाच्या वर्गातून आपलं शिक्षण पूर्ण करण्याचा ध्यास घेतला आहे. विशेष म्हणजे काहीजण वयाच्या सत्तरीतही दहावीची परीक्षा देऊन यशस्वी होत आहेत. प्रौढ शिक्षणासाठी अनोखा उपक्रम घरातील प्रतिकूल परिस्थिती, शाळेची भीती किंवा शिक्षणात फारशी आवड नसणे किंवा उलटून गेलेले वय, असे या ना त्या कारणाने योग्य वयात शिक्षण न घेऊ शकलेल्या अनेकांना त्याचे शल्य राहते. समाजात वावरत असताना मनुष्याला शिक्षणाचे मोल पावलो पावली जाणवत असते. याच शिक्षणाचे मोल ओळखून शासनाने देखील अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. आता शिक्षणापासून वंचित राहिलेल्या प्रौढ निरक्षरांसाठी नागपूर जिल्हा परिषदेने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.

News18लोकमत
News18लोकमत

नवी किरण उपक्रम नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात नवी किरण अंतर्गत प्रौढ शिक्षण अभियान राबविण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे मागील वर्षी या उपक्रमाअंतर्गत अनेकांनी दहावी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. शिक्षणाची विस्कटलेली घडी आता पुन्हा एकदा बसण्याची संधी या उपक्रमातून नागरिकांना मिळाली आहे. नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन या निमित्ताने करण्यात आले आहे. प्रौढ शिक्षण अभियानाला उत्तम प्रतिसाद देशात राहणाऱ्या नागरिकांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी शिक्षण ही प्राथमिक बाब आहे. शिक्षणातून व्यक्तिगत आणि पर्यायाने देशाची सर्वार्थाने प्रगती होत असते. शासनाने सर्व शिक्षा अभियानांतर्गत अनेक उपाययोजना राबविल्या असून त्याच अंतर्गत प्रौढ शिक्षण अभियान देशात राबविले जात आहे. त्यातील एक भाग नागपूर जिल्हा परिषदेच्या वतीने गेल्या शैक्षणिक वर्षातील जानेवारी महिन्यापासून राबविला. नागपुरातील चार तालुक्यात प्रौढ शिक्षण अभियान राबविले असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. नगरचा ‘मिलेट मॅन’, घरी सुरू केली ‘भरड धान्याची बँक’! 81 टक्के महिलांनी केली दहावी नागपूर जिल्हा अंतर्गत येणारे काटोल, कळमेश्वर, नरखेड, आणि सावनेर या चार तालुक्याच्या ठिकाणी गेल्या शैक्षणिक वर्षात प्रौढ शिक्षण अभियान राबविले. ज्यांनी आजवर आपले दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले नाही अशा 200 महिलांसाठी प्रौढ शिक्षण अभियान राबविण्यात आले. जवळपास 200 महिलांपैकी 81 टक्के महिलांना या अभियानाचा फायदा झाला. त्यांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली. दहावी पर्यंतचे शिक्षण होणार यंदा या अभियानाला नवी किरण असे नाव देण्यात आले असून या साठी प्रथम एज्युकेशन फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने गावातील निरक्षरांसाठी ही मोहीम हाती घेतली आहे. आजवर ज्या महिला आणि पुरुषांनी आपले शिक्षण पूर्ण केले नाही त्यांना या स्वयंसेवकांतर्फे शिक्षण दिले जात आहे. त्यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण या माध्यमातून पूर्ण होणार आहे. आजघडील नागपूर जिल्हा परिषदेच्या वतीने हा पायलट प्रोजेक्ट स्वरूपात राबविण्यात येत आहे. पुणे तिथे..; आयफेल टॅावर चक्क पुण्यात? जगातील 7 आश्चर्ये एकाच ठिकाणी निरक्षरांसाठी मोठी संधी आगामी काळात तालुका निहाय स्वयंसेवकांची निवड करून आम्ही हा कार्यक्रमाचे स्वरूप वाढवणार आहोत. आज या अभियानात 40 वर्षांपासून ते 70 वर्षा पर्यंतच्या महिलांचा देखील समावेश आहे. काही कारणास्तव शिक्षणापासून वंचित राहिलेल्या निरक्षरांसाठी ही मोठी उपलब्धी असून याचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन नागपूर जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात