पुणे, 28 जून : जगातील सात आश्चर्ये हे पृथ्वीवरील अद्भुत अशा वास्तुकला आहेत. या वास्तुकला पाहण्याची सर्वानाच इच्छा असते. या वास्तुकला पाहायच्या असतील तर जगातील विविध देशामध्ये जावं लागतं. परंतु पैसा आणि वेळेअभावी हे बघणं शक्य होत नाही. पण या सर्व वास्तुकला तुम्हाला पुण्यामध्ये एकाच ठिकाणी पाहायला मिळतात. पुण्यातील सेव्हन वंडर्स ड्रीम पार्कमध्ये तुम्हाला या सात आश्चर्याचा अनुभव घेता येतो. आबा बागुल यांनी 2011 मध्ये पुण्यामध्ये याची सुरुवात केली. या सेव्हन वंडर्स ड्रीम पार्कमध्ये जगातील सात आश्चर्याच्या लहान-लहान प्रतिकृती आहेत. ताजमहाल, कोलोझियम, पिसाचा झुकता मनोरा, स्टोनहेज, ग्रेट पिरामिड, आयफेल टॉवर आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हे सर्व एकाच ठिकाणी पाहू शकतात.
जगातील सात आश्चर्याचे वैशिष्ट्ये 1. आयफेल टॉवर - पॅरिस शहर फ्रान्स आयफेल टॉवरचा बांधकामाचा कालावधी 1889 ते 1930 आहे. आयफेल टॉवरला डेम दे फेर म्हणजेच पोलादी युवती असेही म्हणतात. ओतीव लोखंडामध्ये बांधलेला लॅटिस टॉवर आहे. जो पॅरिसमध्ये शेम्प दे मार्सवर वसलेला आहे. 1889 मध्ये त्या सालच्या जागतिक जत्रेची प्रवेश कमान म्हणून या टॉवर बांधण्यात आला होता. फ्रान्सची जागतिक सांस्कृतिक खुण आहे. हा टॉवर पॅरिस मधील सर्वात उंच इमारत आहे. 2. युनेस्को जागतिक वारसा स्थळ (स्टोनहेज) - विल्टशायर इंग्लंड स्टोनहेज उभ्या प्रचंड शिळांची एक वर्तुळाकृती असलेले शिळा स्मारक आहे. इसवी सन 2000 ते 3000 च्या काळातील आहे. भोवतालचा गोलाकार मातीचा काठ आणि कालवा जो स्मारकाचा सर्वात पुरातन भाग आहे. इसवी सन 3100 च्या काळातील हे स्थळ आणि त्याच्या सभोवताल एव्हबरी हेज स्मारकाच्या जोडीने 1986 मध्ये युनिस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट करण्यात आले. 3. पिसाचा झुकता मनोरा -पिसा इटली याचा बांधकामाचा कालावधी 1173 ते 1198 आहे . पिसाच्या झुकता मनोरऱ्याचा तळ मजला एक ब्लाइंड आर्केड असून तो पारंपारिक कोरिथिन कॅपिटलच्या स्तंभांनी बनविण्यात आला आहे. 12 व्या शतकातील पिसामध्ये राहणारा प्रसिद्ध कलाकार गुग्ली एल्मो आणि बोनानो पिसानो यांचे आरेखन केल्याचे अनेक वर्ष मानले जात होते.
Pune News : नभ उतरू आले, मग तर फिरलंच पाहिजे! पुण्याजवळील हे 6 ठिकाणं आहेत एकदम बेस्टच photos
4. कोलोझियम - रोम इटली इसवी सन 1970 ते 80 हा बांधकामाचा कालावधी आहे. हे एक अंडाकृती खुले प्रेक्षागृह आहे. जे इटालियन रोम शहराच्या मध्यभागी वसलेले आहे. हे रोमन साम्राज्यामध्ये बांधले गेलेले सर्वात मोठे खुले प्रेक्षागृह आहे. हा रोमन स्थापत्यशास्त्र आणि रोमन अभियांत्रिकीच्या सर्वोत्तम नमुन्यापैकी एक मानला जातो यामध्ये 50 हजार प्रेक्षक बसू शकतात. 5. ग्रेट पिरॅमिड - गाजा इजिप्त 3800 वर्षापेक्षा जास्त प्राचीन आहे. उंची 280 ग्रेट पिरॅमिडचे कित्येक कवचाचे दगड आणि आतील कक्षाचे दगड अत्यंत अचूकतेने एकमेकात जोडले गेलेत. उत्तर पूर्वेकडील केन्सिंग स्टोनच्या मोजमापावर आधारित सांध्यातील मोकळ्या जागेचे मध्यमान फक्त 0.25 मिमी इतके रुंद आहे. पिरॅमिडच्या कारागिराची अचूकता इतकी आहे की पायाच्या चार बाजूंमधील त्रुटी ही सरासरी 58 मिमी लांबीची आहे. 6. ताजमहाल - आग्रा भारत बांधकामाचा कालावधी 1632 ते 1653 आहे. ताजमहालाचा उगम आणि वस्तू शिल्पकला मुघल साम्राज्याच्या भरभराटीचा परमोच्च काळ सुरू असताना 1631 मध्ये बादशहा शहाजनी यांनी पत्नी बेगम मुमताज महल यांच्या मृत्यूपश्चात तिच्या स्मरणार्थ हे स्मारक बांधले आहे. पायाची रचना ही मुख्यता एका विशाल बहुदालनयुक्त तिरफयुक्त कडा असलेल्या घनाची बनली आहे. ज्यामुळे प्रत्येक लांबबाजू वर जवळपास 55 मिनिटे 80 फूट उंचीचा असमान अष्टीकोन तयार होतो. ताजमहालाची बाह्य सजावटी मुघल वास्तुकलेचा एक सर्वोत्तम नमुना आहे. 7. लिबर्टी आयलँड -न्यूयॉर्क अमेरिका स्वतंत्र देवीचा भव्य पुतळा 28 ऑक्टोबर 1880 न्यूयॉर्क येथील लिबर्टी आयलँड येथे उभ्या असलेल्या स्वतंत्र देवीच्या भव्य पुतळ्याचे रेखाटन फ्रेडरिक बार्टहोल्डिं यांनी केले. हा पुतळा 18 व्या शतकातील मध्यांत उदयास असलेल्या शिल्पकलेच्या शैलीतील रेखाटला आहे. व हा स्वतंत्र्याचा पुतळा म्हणजे फ्रान्सच्या लोकांनी अमेरिकेच्या लोकांना दिलेली एक मौल्यवान भेट आहे.
अनेक लोक पाहण्याचा घेत आहेत आनंद बाहेर जाऊन बघण्यापेक्षा हे जगातील सात आश्चर्ये आपण पुण्यामध्येच बघू शकतो. ही संकल्पना बाबासाहेब बागुल यांनी 2011 मध्ये पुण्यामध्ये आणली आणि यामुळे अनेक लोक इथे येऊन पाहण्याचा आनंद घेत आहेत, असे सेव्हन वंडर्स ड्रीम पार्कचे व्यवस्थापक सुनिल सन्स यांनी सांगितलं. कुठे पाहाल? पुण्यातील सहकारनगर परिसरात सेव्हन वंडर्स ड्रीम पार्क आहे. हा स्वारगेट चौकाजवळ, राजीव गांधी अकादमी ऑफ ई-लर्निंगच्या समोर आहे. सकाळी 6 ते 10 दुपारी 4 ते 8 या वेळात तुम्ही पाहू शकतात.