मुंबई, 8 सप्टेंबर : मुंबई आणि ठाण्यात आज दुपारनंतर पावसाने प्रचंड थैमान घातलंय. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात प्रचंड पाऊस पडतोय. या मुसळधार पावसामुळे सर्वत्र हाहाकार उडालाय. ठाण्यात भींत कोसळल्याने दोन जण जखमी झाल्याची माहिती समोर आलीय. तर भांडूपमध्ये एक महिला मोठ्या खड्ड्यात पडलीय. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. अनेक घरं-दुकानांमध्ये पाणी शिरलं. रेल्वे रुळावर पाणी साचल्याने लोकल ट्रेन विस्कळीत झाली. मुसळधार पावसाचे भयानक दृश्येदेखील समोर आले आहेत. त्यानंतर आता कळव्यातील आणखी एक भयानक दृश्य समोर आले आहेत. कळव्यात आज संध्याकाळी रहिवासी भागात वीज कोसळली. वीज कोसळताचे दृश्य कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाले आहेत. मुंब्रा आणि कळवा परिसरात प्रचंड पाऊस पडला. मुंब्र्यात ढगफुटीसदृश्य पाऊस पडला. तर कळव्यात रहिवासी भागात वीज कोसळली. या घटनेत कुणाला काही इजा पोहचली आहे का याबाबत माहिती समजू शकलेली नाही. पण अतिशय भयानक अशी ही घटना होती. संबंधित घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
बापरे! कळव्यात वीज कोसळली, भयानक दृश्य कॅमेऱ्यात कैद #kalva #rain #lightningstruck #MumbaiRain pic.twitter.com/pXDSUs6Ud3
— News18Lokmat (@News18lokmat) September 8, 2022
मुसळधार पावसाने आज ठाणे जिल्ह्याला अक्षरश: झोडपलं आहे. कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याणमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. रेल्वे वाहतुकीवर या पवासाचा प्रचंड मोठा परिणाम पडलाय. मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीक झालीय. सुरुवातीला नाहूर ते विक्रोळी दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर वाहतूक धिम्या गतीने सुरु झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर ठाण्यापासून पुढे कळवा ते कल्याणपर्यंत वाहतूक खोळंबली होती. सध्या एक तास लेट रेल्वे वाहतूक सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. ( मुंबई-ठाण्यातील पावसाचं रौद्र रूप दाखवणारे 3 भयंकर Video ) महाराष्ट्रात येत्या 5 दिवसात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने व्यक्त केला आहे. उद्यापासून मुंबई आणि ठाणे परिसरासह कोकण आणि मध्य महाराष्ट्र भागात त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. पश्चिममध्य व लगतच्या पूर्वमध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. तर ओडिशा, महाराष्ट्र व दक्षिण द्वीपकल्पीय भारतात पुढील 4-5 दिवसांत मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. वायव्य भारतातील मैदानी भागात पुढील 5 दिवसांत पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे.