नागपूर, 30 डिसेंबर : देशाच्या हृदयस्थानी वसलेले उपराजधानी नागपूर ला तब्बल 48 वर्षानंतर इंडियन सायन्स काँग्रेसचे यजमान पद लाभले आहे. 108 व्या सायन्स काँग्रेसचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 3 जानेवारी रोजी संपन्न होणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे यंदा शताब्दी वर्ष साजरे होत आहे. या निमित्याने नवं वर्षाचा पहिला आठवडा नागपूरकरांसाठी विज्ञानाच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शताब्दी वर्ष साजरे करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला तब्बल 48 वर्षांनंतर इंडियन सायन्स काँग्रेसचे यजमान पद लाभले असून या 108 व्या सायन्स काँग्रेसमध्ये विज्ञान जगतातील अनेक आयाम आणि सर्वसमावेशक माहिती यातून मिळणारा आहे. या इंडियन सायन्स काँग्रेसमधे देशविदेशातले शास्त्रज्ञ, 10 ते 12 हजार प्रतिनिधीसह 100 पेक्षा जास्त वक्ते व तज्ज्ञ उपस्थित राहणार आहे. तसेच सायन्स काँग्रेसमध्ये 3 हजारापेक्षा जास्त पेपर - प्रेझेंटेशन केले जाणार आहे. सुमारे 100 संशोधक मार्गदर्शन करणार आहे. 500 पेक्षा जास्त आदिवासी प्रतिनिधी व एक हजारावर शेतकरीही सायन्स कॉंग्रेसमध्ये उपस्थित होणार आहे. 1974 ला नागपूरला यजमान पद विज्ञान जगतामध्ये ज्या ज्या नव्या गोष्टी घडल्या आहेत त्या संबंधित माहिती आणि तज्ञांनी आपापल्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल, रिसर्च क्षेत्रातील कामगिरी बद्दल विचारांची आदान प्रदान या माध्यमातून होत असते. याआधी 1974 साली 61 व्या इंडियन सायन्स काँग्रेसचे यजमानपद नागपूर विद्यापीठाने भूषविले होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते त्या काँग्रेसचे उद्घाटन झाले होते.
1914 सालापासून सुरुवात विज्ञानाच्या क्षेत्रात मैलाचा दगड ठरलेली ही परिषद 1914 साली सुरू झाली. त्यानंतर 1920 साली सातवी, 1931 साली अठरावी, तसेच 1945 साली 32 वी सायन्स काँग्रेस नागपूरमध्ये पार पडली. आता या आयोजनाचे स्वरूप अतिभव्य झाले असून 108 व्या काँग्रेसमध्ये शंभरावर मुख्य व्याख्याने व चारशेवर इतर व्याख्याने होणार आहे. Video : तुमची फसवणूक तर होत नाही? वजन मापाची अशी करा तपासणी महिला सबलीकरण शैक्षणिक दृष्टिकोणातून जरी या सायन्स काँग्रेसचे आयोजन करण्यात आले असले तरी ही काँग्रेस सर्व क्षेत्रात उपयुक्त ठरणार आहे. यात प्रामुख्याने फार्मर्स मीट, ट्रायबल मीट, वुमन्स सायन्स काँग्रेस यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. शाश्वत विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञान व त्याद्वारे महिला सबलीकरण अशी या आयोजनाची थीम आहे. यामध्ये सर्वच गटातील लोक सहभागी राहणार आहे. केंद्र शासनाचा हा कार्यक्रम असून 3 ते 7 जानेवारीपर्यंत आयोजित या सायन्स काँग्रेसचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन केले जाणार आहे. मटक्यात शिजणारं बिहारचं फेमस ‘चंपारण मटण’ आता नागपुरात! पाहा Video तयारी अंतिम टप्प्यात 2009 मधील नोबेल पुरस्कार विजेते क्रिस्टलोग्राफर अडा ई. योनाथ (इजराईल ) व 2016 मधील नोबेल पुरस्कार विजेते सर फ्रेजर स्टॉडार्ट (ब्रिटन) प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सायन्स काँग्रेसची तयारी अंतिम टप्प्यात आहे. सर्व कार्यक्रम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कॅम्पस मध्येच होणार आहे, अशी माहिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी दिली.