जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Video : तुमची फसवणूक तर होत नाही? वजन मापाची अशी करा तपासणी

Video : तुमची फसवणूक तर होत नाही? वजन मापाची अशी करा तपासणी

Video : तुमची फसवणूक तर होत नाही? वजन मापाची अशी करा तपासणी

अनेक दुकानदार वजन आणि मापामध्ये फसवणूक करतात. मात्र, अशी फसवणूक होऊ नये, यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.

  • -MIN READ Local18 Wardha,Wardha,Maharashtra
  • Last Updated :

    वर्धा, 29 डिसेंबर : ग्राहकांना वस्तू विक्री करताना ती कमी वजनाची देऊन फसवणूक केली जाते. अनेक ग्राहकांना हा प्रकार लक्षात येत नाही. तर काही ग्राहकांना फसवणुकीचा प्रकार लक्षात येऊनही वेळेअभावी तक्रार करत नाही. ग्रामीण भागात असे प्रकार मोठ्या प्रमाणात होतात. ग्राहकांकडून संपूर्ण पैसे वसूल करून मापात पाप केले जाते. ग्राहकांनी फसवणूक टाळण्यासाठी कोणती खबरदारी घेतली पाहिजे पाहुयात. अनेक दुकानदार वजन आणि मापामध्ये फसवणूक करतात. मात्र, अशी फसवणूक होऊ नये, यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ संबंधित विभागाकडे तक्रार करणे आवश्यक आहे. नागरिकांना फसवणुकीसंदर्भात वैध मापनशास्त्र विभागाकडे तक्रार करता येते. नागपूर विभागीय सहनियंत्रक वैद्यमापनशास्त्र यांच्या नियंत्रणात वर्धा जिल्ह्यातील तिन्ही उपविभागातील वैद्यमानशास्त्र निरीक्षकांनी 1 एप्रिल ते 27 डिसेंबरपर्यंत वजनमापे तपासणी मोहीम राबविली. यात तब्बल 50 दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. यात 1 लाख 55 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अधिवेशनच्या कामातील विरंगुळा, आमदारांसाठी उभारली मनोरंजनाची सुविधा Video फसवणूक करणे गुन्हा ग्राहकांची फसवणूक करणे हा गुन्हा असून बऱ्याचदा बाजारपेठेतील विक्रेते मापात पाप करून ग्राहकांची फसवणूक करतात. काट्यामध्ये कमी वजनाने दगड वापरून दिशाभूल करतात. तर मापातही ठोकपीट करून फसवणूक करतात. त्यामुळे ही फसवणूक टाळण्यासाठी वैद्यमापन निरीक्षकाकडून नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. व्यावसायिकांकरिता ग्राहक हे देवाप्रमाणे असतात. त्यामुळे व्यावसायिकांनी ग्राहकांची दिशाभूल किंवा फसवणूक न करता प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करावा. ग्राहकांना योग्य वजनमापाने वस्तू द्याव्या. तसेच नियमानुसार उपाययोजना करावी. ग्राहकांना संशय आल्यास त्यांच्या विनंतीवरून योग्य वजन करून देणे, व ग्राहकांचे समाधान व्यावसायिकांना बंधनकारक आहे. व्हाट्स ॲपवरही करता येईल तक्रार ग्राहकांना वजन काट्यामध्ये संशय आल्याने त्यांना तक्रार करण्यासाठी वैद्यमापनशास्त्र विभागाकडून 9404951828 हा व्हाट्स ॲप क्रमांक दिला आहे. याचसोबत सहनियंत्रक वैद्यमानशास्त्र विभागीय कार्यालय नागपूर, उपनियंत्रक वैद्यमापनशास्त्र विभाग आणि वैद्यमानशास्त्र निरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रारही करता येते. साखरेपेक्षा चिक्कीचा गूळ खातोय भाव, पाहा काय आहेत दर ? Video संशय आल्यास तक्रार करा ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून नियमित वजनमापे तपासणी सुरू असते. जिल्ह्यातील तिन्ही उपविभागातील अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षभरात 50 कारवाया करून 1 लाख 55 हजारांचा दंड वसूल केला. अजूनही तपासणी सुरू असून काही संशय आल्यास तक्रार करावी, अशी माहिती नारायण आष्टके वैद्यमापनशास्त्र निरीक्षक यांनी दिली आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: Local18 , wardha
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात