नागपूर : नागपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अत्यंत किळसवाणी घटना समोर आली असून या प्रकरणी नगरपंचायतीकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. नागरिकांना रक्त असलेलं पाणी मिळत असल्याची तक्रार देण्यात आली. ही धक्कादायक घटना नागपूरच्या महादूला परिसरात घडली आहे. महादूला भागात पिण्याच्या पाण्यात कोंबड्यांचं रक्त आल्याचा दावा तिथल्या स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. पाणी भरण्यासाठी लावलं तेव्हा रक्ताच्या रंगाचं पाणी आलं, त्यामुळे खळबळ उडाली आणि गोंधळ सुरू झाला.
नागपुरातील धक्कादायक प्रकार, घरात नळाला आलं रक्ताचं पाणी#marathinews #nagpur #news18lokmat pic.twitter.com/LfatTk7CFs
— News18Lokmat (@News18lokmat) May 17, 2023
या परिसरात असलेल्या चिकन सेंटरकडून कोंबड्यांचं रक्त सोडलं जात होतं. ज्याची योग्य ती विल्हेवाट न लावल्याने ते पाण्यात मिसळल्याचा दावा केला जात आहे.
नागपुरात ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून लूट, मुंबई, पुण्यासाठी दुपटीवर भाडेवाढअनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. या प्रकरणी नगरपंचायतकडे तक्रार केल्यावर चौकशी दरम्यान हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Nagpur News : तत्काळ बुकिंगचा काळाबाजार, पोलिसांकडून पर्दाफाश; दिली महत्त्वाची माहितीनगरपंचायतने मांस विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करून पाणीपुरवठा पूर्ववत केला आहे. परिसरातील मांस विक्रेते इतरत्र हटविण्याची परिसरातील नागरिकांची मागणी केली आहे. या प्रकरणी आता पुढे काय कारवाई केली जाते ते पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

)







