नागपूर, 23 फेब्रवारी : मागच्या चार दिवसांपासून राज्यात विविध ठिकाणी शिवजयंती उत्सव साजरा केला जात आहे. दरम्यान नागपुरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपुरात शिवजयंती कार्यक्रमावेळी तलवारी नाचवण्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी दहशत माजवणाऱ्या भाई लोकांना चांगलाच हिसका दाखवला आहे. रॅलीवेळी नंग्या तलवारी नाचवत दङसत माजण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता यावरून पोलिसांनी कारवाई केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित रॅलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये अनेक तरुण हातात तलवारी घेऊन फिरताना दिसत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी रॅलीचे आयोजन करणाऱ्या तरुणांसह नऊ तरुणांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्याचबरोबर सहा तरुणांना अटकही करण्यात आली आहे. 19 फेब्रुवारीली हिंदवी समाज समुहाने रॅली काढली होती. नागपूरातील पारडी येथील रामभूमी सोसायटी ते मोमीनपुरा, गोळीबार चौक- वाड्यावर असलेल्या गांधी गेटपर्यंत या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
हे ही वाचा : ‘चुकून बोलून गेलो’; त्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागितली जाहीर माफी
या रॅलीत सुमारे 60-70 दुचाकींचा सहभाग होता. रॅली मोमीनपुरामधून जाताच रॅलीत सहभागी अनेकांनी तलवारी काढून नाचवायला सुरुवात केली. डीजेच्या गाडीत बसलेल्या अर्पण गोपलेने त्याचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर अपलोड केला. व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हिंदवी साम्राज्य ग्रुपतर्फे पारडी येथून रॅली निघाली होती. ही रॅली शहराच्या विविध भागातून फिरत मोमीनपुरा भगवा घर परिसरात आली. दरम्यान जामा मशीद समोरून जात असताना या रॅलीतील तरुणांनी मशिदीसमोर तलवारी फिरवत घोषणाबाजी करत असल्याचे आढळून आले. समाजात निर्माण होऊ नये याकरिता पोलिसांनी या व्हायरल व्हिडिओची गांभीर्याने दाखल घेत तातडीने सहा तरुणांना अटक केली आहे.
या तरुणांचा अति उत्साह नडल्याचे या प्रकरणातून दिसून येत आहे. या यात एक डीजे चालक तर एक ऑपरेटर आहे. या रॅलीचे आयोजक अंकित पंचबुद्धे आणि आशिष अबोले हे फरार आहेत. याप्रकरणी त्यांच्या सहकाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत. या कारवाईसाठी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या नेतृत्वात पोलीस उपायुक्त व तहसील पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना घेरावही घालण्यात आला.
हे ही वाचा : आता ठाकरे गटाचा मोर्चा भाजपच्या बालेकिल्ल्याकडे; नेत्यांचा विदर्भ दौरा, प्लॅन ठरला!
समाजातील वातावरण चिघळत असल्याने नागपूर शहर जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वसीम खान यांनी पुढाकार घेत विविध संघटनाच्या साथीने तक्रार पोलीस उपायुक्त गोरख भामरे व तहसील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे तक्रार केली.

)







