Home /News /maharashtra /

आधी चिखलदऱ्याला घेऊन गेला अन्...; नागपुरातील पोलिसाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

आधी चिखलदऱ्याला घेऊन गेला अन्...; नागपुरातील पोलिसाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

सिव्हिल लाईन्स येथील गडचिरोलीच्या डीआयजी कार्यालयात आरोपी प्रदीप हा कार्यरत आहे. तर पीडित 17 वर्षीय मुलगी 12 वीची विद्यार्थिनी आहे.

नागपूर, 18 जुलै : मैत्री केल्यावर शेतात लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना विदर्भातील वर्धा जिल्ह्यातून समोर आली होती. ही घटना ताजी असतानाच आता विदर्भातीलच नागपूर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका पोलीस निरीक्षकाने नागपुरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला चिखलदऱ्यातील लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - या प्रकरणातील आरोपी पोलीस निरीक्षकाला अटक करण्यात आली आहे. प्रदीपकुमार श्रीकृष्ण नितवने (35, फ्रेंड्स कॉलनी, गिट्टी खदान) असे अटक केलेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करून संबंधित उपनिरीक्षकाला अटक केली. सिव्हिल लाईन्स येथील गडचिरोलीच्या डीआयजी कार्यालयात आरोपी प्रदीप हा कार्यरत आहे. तर पीडित 17 वर्षीय मुलगी 12 वीची विद्यार्थिनी आहे. ती काही महिन्यांपूर्वी प्रदीपकुमारच्या संपर्कात आली होती. ती एकटीच असल्यामुळे तिच्या आई-वडिलांनी प्रदीपला तिच्याकडे लक्ष देण्याची विनंती केली होती. यामुळे त्याचे तिच्या घरी येणे-जाणे होते. अशातच 13 जुलैला प्रदीपने कुटुंबीयांना मित्रांसोबत चिखलदरा येथे जात असल्याचे सांगितले. यानंतर तो विद्यार्थिनीला सरप्राइज देण्याच्या बहाण्याने चिखलदरा येथे घेऊन गेला. याठिकाणी गेल्यावर ते एका हॉटेलमध्ये थांबले. मात्र, प्रदीपने तिला गुंगीचे औषध दिले. तसेच तिला दारू पाजल्यानंतर तिच्याशी जबरदस्ती केली. तिने विरोध केल्यानंतर प्रदीप शांत झाला. त्याने आपला भांडाफोड होण्याच्या भीतीने अल्पवयीन मुलीला आत्महत्या करण्याची धमकीही दिली. या धमकीमुळे विद्यार्थिनी शांत झाली आणि दुसऱ्या दिवशी प्रदीपने तिला नागपूरला तिच्या खोलीवर सोडले. हेही वाचा - वर्धा : मैत्री करुन मित्राच्या शेतात लैंगिक शोषण, सहा महिन्यांनी धक्कादायक माहिती समोर
पीडित मुलीने शुक्रवारी आपल्या आई-वडिलांना आपबिती सांगितली. यानंतर तिच्या कुटुंबीयांनी आरोपी प्रदीपविरोधात शनिवारी सीताबर्डी ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तसेच गडचिरोली डीआयजी कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. आरोपी प्रदीपची शिपाई म्हणून निवड झाली होती. यानंतर विभागीय परीक्षा देऊन तो उपनिरीक्षक झाला आहे. त्याच्याविरुद्ध अपहरण, बलात्कार आणि पॉक्सोनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Crime news, Nagpur News, Sexual harassment

पुढील बातम्या