मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Nagpur: ऑनलाईन सभा सुरू असताना सिगारेटचे झुरके, नागपूर महानगरपालिकेतील नगरसेवकाचं कृत्य, VIDEO VIRAL

Nagpur: ऑनलाईन सभा सुरू असताना सिगारेटचे झुरके, नागपूर महानगरपालिकेतील नगरसेवकाचं कृत्य, VIDEO VIRAL

प्रातिनिधिक फोटो (Shutterstock Image)

प्रातिनिधिक फोटो (Shutterstock Image)

नागपुरातील नगरसेवकाने महानगरपालिकेच्या ऑनलाईन सभेदरम्यान चक्क सिगारेटचे झुरके मारल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल होत आहे. (Nagpur corporator smoking during online meeting of municipal corporation)

  • Published by:  Sunil Desale

नागपूर, 31 जानेवारी : कोरोनाच्या काळात ऑनलाईन बैठका, वर्क फ्रॉम होम सुरू करण्यात आले. खासगी कार्यालय असो किंवा सरकारी कार्यालय सर्वच ठिकाणी ऑनलाईन बैठकांना प्राधान्य देण्यात येत आहे. अशाच प्रकारे नागपुरातील महानगरपालिकेची ऑनलाईन बैठक (Nagpur Municipal Corporation online meeting) सुरू होती आणि त्याच दरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला आहे. महानगरपालिकेचा एक नगरसेवक ऑनलाईन बैठक सुरू असताना चक्क सिगारेटचे झुरके मारत असल्याचं दिसून आलं. ऑनलाईन बैठक सुरू असताना हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आणि त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. (Nagpur corporator smoking during online meeting of Municipal corporation)

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर महानगरपालिकेची एक ऑनलाईन बैठक सुरू होती. या बैठकीत काही कंपन्यांचे काम समाधानकारक नसल्याने त्यांचे कंत्राट रद्द करण्याची शिफारस करण्यात आली. या विषयावर चर्चा सुरू असताना काँग्रेस नगरसेवक रमेश पुणेकर हे चक्क सिगारेट ओढत असल्याचं दिसून आलं.

वाचा : रायगड हादरले ! अल्पवयीन मुलीवर 10 जणांचा आळीपाळीने सामूहिक बलात्कार, 7 जणांना अटक तर 3 फरार

या ऑनलाईन सभेत नागपूर महानगरपालिकेचे महापौर, महानगरपालिकेचे आयुक्त आणि इतरही नगरसेवक उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत ऑनलाईन बैठक सुरू असताना नगरसेवक रमेश पुणेकर हे बिंधास्तपणे सिगारेट ओढत होते. बैठक ऑनलाईन होत असल्याने संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आणि पाहता पाहता अवघ्या काही वेळातच त्यांचा हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला.

वाचा : "2024 पर्यंत काहीतरी होईल.. पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल" : केंद्रीय मंत्री कपिल पाटील

महानगरपालिकेच्या बैठकीत नगरसेवक रमेश पुणेकर हे सिगारेट ओढत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. यावरुन त्यांच्यावर जोरदार टीकाही होत आहे. नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया सुद्धा येताना पहायला मिळत आहेत. सभा सुरू असताना असे कृत्य करणाऱ्या नगरसेवकाला नागरिकांच्या आणि शहरातील प्रश्नांबाबत गांभीर्य नाहीये का? असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे.

शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा सुरू असताना नगरसेवकच गांभीर्याने न घेता अशा प्रकारे कृत्य करत असल्याने नागरिकांकडून टीकेची झोड उठवण्यात येत आहे. तसेच नगरसेवक रमेश पुणेकर यांच्या या कृत्यामुळे आता इतर मनपाच्या सदस्यांच्या प्रतिमाही डागाळल्या जात आहेत.

First published:

Tags: Nagpur, Online meetings, काँग्रेस