Home /News /maharashtra /

"2024 पर्यंत काहीतरी होईल.. पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल" : केंद्रीय मंत्री कपिल पाटील

"2024 पर्यंत काहीतरी होईल.. पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल" : केंद्रीय मंत्री कपिल पाटील

"2024 पर्यंत काहीतरी होईल.. पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल" : केंद्रीय मंत्री कपिल पाटील

"2024 पर्यंत काहीतरी होईल.. पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल" : केंद्रीय मंत्री कपिल पाटील

PoK will be in India till 2024 said union minister Kapil Patil: 2024 पर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग असेल असे विधान केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी केलं आहे.

    कल्याण, 30 जानेवारी : पाकव्याप्त काश्मीर (PoK) पुन्हा भारतात (India) येईल असं विधान केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी केलं आहे. कल्याण येथे आयोजित एका व्याख्यानमालेत त्यांनी हे विधान केलं आहे. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील (Union Minister Kapil Patil) यांनी म्हटलं, कदाचित 2024 पर्यंत काहीतरी होईल... पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. या सर्व गोष्टी फक्त मोदी करू शकतात. (Something will happen by 2024 and PoK will come in India) कपिल पाटील यांनी पुढे म्हटलं, मला आठवत आहे की, काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर त्यावर राज्यसभेत मोदींनी यावर उत्तर देताना पी. व्ही. नरसिंहराव यांचं उदाहरण दिलं होतं. नरसिंहराव ज्यावेळी पंतप्रधान झाले होते त्यावेळी त्यांनी जॉईंट पार्लमेंटचं सेशन घेतलं होतं आणि त्यावेळी त्यांनी एक कायदा पारित केला होता आणि नमूद केलेलं की, काश्मीर देशाची फार मोठी समस्या आहे. का समस्या आहे तर पाकव्याप्त काश्मीर त्यांच्या ताब्यात आहे आणि तो कधी ना कधी भारताने आपल्या ताब्यात घेतला पाहिजे तेव्हाच देशाची समस्या सुटेल. पाकव्याप्त काश्मीर भारताने आपल्या ताब्यात घेतल्याशिवाय समस्या सुटणार नाही. आता आपण वाट पाहूयात, कदाचित 2024 पर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही कारण या सर्व गोष्टी फक्त मोदी करु शकतात. त्यामुळे आपण कांदे-बटाटे, तूरडाळ, मुगडाळ यांच्या महागाईतून आपण बाहेर यायला पाहिजे असंही केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी म्हटलं आहे. वाचा : राहुल गांधींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, भिवंडीतील प्रकरणाला नवे वळण 'मोदीजी आम्हाला या अत्याचारातून मुक्त करा'; PoK मधील व्यक्तीची मदतीसाठी हाक पाकिस्तान सरकार आणि लष्कराच्या आश्रयाखाली पीओके हे दहशतवाद्यांचं सुरक्षित आश्रयस्थान बनलं आहे. तर स्थानिक नागरिक मात्र पाकिस्तानी सरकारमुळे सतत त्रस्त आहेत. दरम्यान, पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मलिक वसीम नावाच्या व्यक्तीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मदतीचं आवाहन केलं आहे. ट्विटरवरील या व्हिडीओमध्ये मुझफ्फराबादचा रहिवासी मलिक वसीम म्हणत आहे की नरेंद्र मोदी या आणि आम्हाला या अत्याचारातून मुक्त करा. या व्यक्तीनं सांगितलं की स्थानिक पोलीस आणि प्रशासनाने आमचं घर सील केलं आहे आणि आम्हाला घरातून बाहेर काढलं आहे. माझी मुलं आणि बाकीचं कुटुंब पावसात रस्त्यावर बसलं आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: India, Narendra modi, Pakistan

    पुढील बातम्या