Home /News /maharashtra /

रायगड हादरले ! अल्पवयीन मुलीवर 10 जणांचा आळीपाळीने सामूहिक बलात्कार, 7 जणांना अटक तर 3 फरार

रायगड हादरले ! अल्पवयीन मुलीवर 10 जणांचा आळीपाळीने सामूहिक बलात्कार, 7 जणांना अटक तर 3 फरार

रायगड जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. (17 year old girl gangraped in Raigad district of Maharashtra)

    रायगड, 30 जानेवारी : राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत. आता रायगड जिल्ह्यातून (Raigad district) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका 17 वर्षीय मुलीवर 10 जणांनी मिळून सामूहिक बलात्कार (17 year old girl gangraped) केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Minor girl gangraped by 10 people in Raigad district of Maharashtra) रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वाशी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलगी 17 वर्षीय आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तिच्या दोन मित्रांनी तिच्यावर शारीरिक अत्याचार केले होते. याची माहिती त्यांच्या मित्रांना कळाली आणि मग त्या मित्रांनी पीडित मुलीला धमकावण्यास सुरुवात केली. पीडित मुलीला धमकी देत आरोपींनी तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आपला तपास सुरू केला. वडखळ पोलिसांनी गुन्हा दाखल करुन 7 जणांना अटक केली आहे. तर अद्यापही तीन आरोपी फरार आहेत. या कृत्यात आणखी काही तरुणांचा समावेश असल्याचा संशयही पोलिसांना आहे. फरार असलेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या प्रकरणात वडखळ पोलीस अधिक तपास करत आहेत. वाचा : बायको माहेरी गेली, रागावलेल्या पतीचा सासरवाडीत घातपात, सासूचा जीव घेतला काही दिवसांपूर्वी डोंबिवलीत घडली होती अशीच घटना सप्टेंबर 2021 मध्ये डोंबिवलीतही एका मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. 22 सप्टेंबर 2021 रोजी सायंकाळच्या सुमारास मानपाडा पोलिसांत पीडित मुलीने एक तक्रार दिली. तिने सांगितले की जानेवारी 2021 ते 22 सप्टेंबर 2021 या कालावधीत तिच्यावर डोंबिवली, बदलापूर, रबाळे, मुरबाड या वेगवेगळ्या ठिकाणी तिच्या ओळखीतल्या मुलांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानुसार मानपाडा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. मुलगी 15 वर्षीय अल्पवयीन असल्याने पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हे कृत्य करताना आरोपींनी व्हिडीओ शूट केलं होतं आणि या व्हिडीओच्या आधारे पीडित मुलीला ते वारंवार ब्लॅकमेल करत होते. त्यानंतर आरोपींनी तिला डोंबिवली, बदलापूर, रबाळे आणि मुरबाड अशा विविध ठिकाणी नेत तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी सर्व आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर 400 जणांकडून बलात्कार बीडमध्ये एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 400 जणांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली. बालहक्क कार्यकर्त्यांच्या सजगतेमुळे हे प्रकरणं समोर आलं आहे होतं. संबंधित घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे घडली आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या असहाय्यतेचा फायदा घेत सहा महिन्यांच्या काळात तब्बल 400 जणांनी तिच्यावर अत्याचार केला होता.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Crime, Gang Rape, Raigad

    पुढील बातम्या