उदय तिमांडे (नागपूर) 14 फेब्रुवारी : नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिड वर्षांच्या चिमुकलीकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम महागात पडले आहे. एखादी विषारी वस्तू लहानमुलांपासून दूर ठेवा असे या उत्पादनांवर लिहलेले असते. अशी माहिती दिलेली असताना देखील पालकांचे याकडे कधीकधी होणारे दुर्लक्ष किती महागात पडू शकते. अशीच घटना नागपुरात समोर आली आहे. सोमवारी (दि. 13) पाहायला एका दीड वर्षाच्या चिमुकलीचा डास मारण्याचे औषध तोंडात गेल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सक्करदरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या या घटनेतील मृत चिमुकलीचे नाव रिद्धी असे आहे. दीड वर्षाची ही चिमुकली पलंगावर घरी खेळत होती. खेळता खेळता मच्छर मारण्याचे औषध तिने तोंडात घातले व ती चाटायला लागली अबोल अशा रिद्धीला आपण काय करतो याची कल्पना नव्हती.
काही वेळातच तिची प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आले मात्र तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नागपुरातील आशीर्वाद नगरमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे.
हे ही वाचा : हे काय कारण आणि वय होतं का? चप्पल घेऊन दिली नाही म्हणून 10 वर्षांच्या नातवाने संपवलं आयुष्य
दीड वर्षाचा मुलीने डासांच्या लिक्वीडची बॉटल तोंडात टाकल्याने मृत्यू. घरात लावलेली डास पळविणारी मशीन खेळता खेळता रिद्धीने हाती घेतली कुणाचे लक्ष नसल्याने तिने ती बॉटल तोंडात टाकली यात तिचा मृत्यू झाला.

)







