जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / हे काय कारण आणि वय होतं का? चप्पल घेऊन दिली नाही म्हणून 10 वर्षांच्या नातवाने संपवलं आयुष्य

हे काय कारण आणि वय होतं का? चप्पल घेऊन दिली नाही म्हणून 10 वर्षांच्या नातवाने संपवलं आयुष्य

युवराज श्रीमंत मोरे (वय 10) याचे आईवडील ऊसतोड मजूर आहेत. त्यामुळे युवराज आजोळी हिंगणी (खु) येथील विश्वनाथ काशिनाथ उजगरे यांच्याकडे आला होता.

युवराज श्रीमंत मोरे (वय 10) याचे आईवडील ऊसतोड मजूर आहेत. त्यामुळे युवराज आजोळी हिंगणी (खु) येथील विश्वनाथ काशिनाथ उजगरे यांच्याकडे आला होता.

युवराज श्रीमंत मोरे (वय 10) याचे आईवडील ऊसतोड मजूर आहेत. त्यामुळे युवराज आजोळी हिंगणी (खु) येथील विश्वनाथ काशिनाथ उजगरे यांच्याकडे आला होता.

  • -MIN READ Bid,Bid,Maharashtra
  • Last Updated :

बीड, 14 फेब्रुवारी : लहान मुलांना कशाचा राग येईल आणि रागाच्या भरात कधी काय करतील याचा नेम नाही. बीडमध्ये अशीच धक्कादायक घटना घडली आहे. नवीन चप्पल घेतली नाही म्हणून एका 10 वर्षीय नातवाने गळफास घेऊन आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीडच्या कासारी बोडखा इथंही घटना घडली आहे. 10 वर्षीय नातवाने आजीने नवीन चप्पल घेतली नाही, याचा राग मनात धरून गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीडच्या बोडाखा कासारी येथे घडली. युवराज श्रीमंत मोरे असं मृत चिमुकल्याचे नाव आहे. (सासुला धडा शिकवण्यासाठी सुनेने आखला डाव; कोंढवा पोलिसांनी लावला छडा) बोडखा कासारी येथील युवराज श्रीमंत मोरे (वय 10) याचे आईवडील ऊसतोड मजूर आहेत. त्यामुळे युवराज आजोळी हिंगणी (खु) येथील विश्वनाथ काशिनाथ उजगरे यांच्याकडे आला होता. दरम्यान, युवराजने नवीन चप्पल आजीला मागितली. मात्र, चप्पल घेण्यास नकार दिला. त्यावेळी युवराज आई-वडिलांकडे जातो असे, म्हणून घराबाहेर पडला. त्यानंतर गावाजवळच असलेल्या एका झाडाला साडीने गळफास घेत त्याने आत्महत्या केली. (धक्कादायक! प्रियकर भाऊ असल्याचं भासवत पतीला दिलं विष, वाचा कसा झाला खुलासा) दिंद्रुड पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवला आहे. शुल्लक कारणावरून लहान मुलं टोकाचं पाऊल उचलत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: beed news
  • First Published :
जाहिरात
जाहिरात