विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 12 जून: राज्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी खूशखबर आहे. राज्यात वनरक्षक ( गट क संवर्ग ) पदांच्या एकूण 2,138 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. ही पदे सरळसेवा पद्धतीने भरती करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सदर पदांकरीता उमेदवार हा इयत्ता भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, गणित यापैकी एका विषयांसह 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांस मराठी भाषा लिहणे, वाचणे आणि बोलता येणे आवश्यक असणार आहे. वनरक्षक पदांच्या जागा कुठे? वनरक्षक पदांपैकी नागपूर वनवृत्तामध्ये वनरक्षकांची एकूण 277 पदे, चंद्रपूर वनवृत्तांमध्ये 122 जागा, गडचिरोली वनवृत्तांमध्ये 197 जागा, अमरावती वनवृत्तांमध्ये 250 जागा, यवतमाळ वनवृत्तांमध्ये 79 जागा, औरंगाबाद वनवृत्तामध्ये 83 जागा, धुळे वनवृत्तांमध्ये 246 जागा, नाशिक वनवृत्तांमध्ये 99 जागा, पुणे वनवृत्तांमध्ये 73 जागा, ठाणे वनवृत्तांमध्ये 460 जागा, कोल्हापूर वनवृत्तांमध्ये 249 जागा, असे एकूण 2,138 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
वनरक्षक पदासाठीची वेतनश्रेणी वनरक्षक ( गट क ) पदांकरीता सातव्या वेतन आयोगानुसार एस-7 नुसार 21,700 - 69,100 या वेतनश्रेणींमध्ये वेतन + इतर लागू असणारे वेतन , भत्ते अनुज्ञेय असणार आहेत. अर्ज प्रक्रिया आणि आवेदन शुल्क जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर दि.10.06.2023 पासून ते दि.30.06.2023 पर्यंत सादर करायचे आहेत. सदर भरतीसाठी उमेदवारांकडून आवेदन शुल्क म्हणून अमागास प्रवर्गाकरीता 1 हजार रुपये तर मागास वर्गीय, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, अनाथ प्रवर्गातील उमेदवारांकरीता 900 रुपये भरावे लागतील. तर माजी सैनिक उमेदवारांकरीता कोणतीही शुल्क आकारण्यात येणार नाही . आता गुरुजींचीच होणार परीक्षा, महत्त्वाचं कारण आलं पुढं, Video शैक्षणिक पात्रता 1. उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच 12 वीची परीक्षा विज्ञान, गणित, भूगोल आणि अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी. 2.अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 10 वी उत्तीर्ण केली असल्यास असा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील. 3.माजी सैनिक असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 10 वी उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील. 4.नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले बनखबरे व वन कर्मचा-यांचे पाल्य असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 10 वी उत्तीर्ण केली असल्यास असा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील. (टिप:- नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले बनखबरे व वन कर्मचा-याचे संबंधात वरील प्रयोजनाकरिता शासकीय वैद्यकीय अधिकारी आणि पोलिस खात्यातील घटनेच्या कार्यक्षेत्रातील सक्षम पोलिस अधिकारी यांचे कडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र विचारार्थ घेण्यात येईल.) 5. अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे. 6. मराठी भाषेचे ज्ञान (लिहीणे, वाचणे व बोलणे) आवश्यक आहे. सविस्तर जाहिरात www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर भरती प्रक्रिया (Recruitment) या टॅबमध्ये उपलब्ध आहे. ही जाहिरात प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख), म. रा. नागपूर यांचे मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे.