रोहित देशपांडे, प्रतिनिधी बीड, 9 जून: सध्या शिक्षण क्षेत्रात नवनवे बदल होत आहेत. विद्यार्थ्यांना सातत्यानं परीक्षांना सामोरं जावं लागतं हे आपल्या सर्वांच्याच परिचयाचं आहे. पण आता शिकक्षकांनाही परीक्षा द्यावी लागणार आहे. मराठवाड्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची लवकरच अशी परीक्षा होणार आहे. त्याबाबत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आदेश पारीत केले असून जुलैमध्ये ही परीक्षा होईल. पिढी घडवण्याची जबाबदारी शिक्षकांवर अनेक शिक्षक चांगले विद्यार्थी घडवत असतात. पिढी घडवण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवरच असते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळांच्या माध्यमातून शिक्षण उपलब्ध होते. मात्र, काही वेळा जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या नवीन ज्ञान, तंत्रज्ञान आत्मसात करण्यावर प्रश्न उपस्थित केले जातात. शाळेची गुणवत्ता ही शिक्षकांच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. त्यामुळे शिक्षक नव्या शैक्षणिक बदलांस कितपत तयार आहेत हे तपासण्याची गरज व्यक्त केली जाते.
शिक्षण क्षेत्रातील बदल शिक्षण क्षेत्रात नवनवीन बदल घडत आहेत. प्रत्येक गाव खेड्यात आता आधुनिक शिक्षण झाले आहे. सर्व शाळांमध्ये इंटरनेट पोहोचले आहे. तर विद्यार्थ्यांच्या हाती स्मार्ट टॅब देखील आले आहेत. यातच गुरुजी देखील मागे राहिलेले नाहीत. त्यांना देखील आधुनिक तंत्रज्ञानाचे अनेक वेळा ट्रेनिंग दिले आहे. आता हेच ज्ञान त्यांनी कितपत आत्मसात केले आहे. हे पाहण्यासाठी ही प्रेरणा परीक्षा असणार आहे. विभागीय आयुक्तांचे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शिक्षकांच्या परीक्षेबाबत आदेश पारीत केले आहेत. जुलै महिन्यात शिक्षकांची परीक्षा पार पाडणार आहे. 1 ते 10 वी पर्यंत शिकवणाऱ्या जिल्हा परिषदेत शाळेतील शिक्षकांसाठीच ही परीक्षा असणार आहे. या परीक्षेचे अध्यक्ष प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहणार आहेत. तर सहअध्यक्ष जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहणार आहेत. पालकांच्या खिशाला लागणार कात्री, पुस्तकांच्या किंमती वाढल्या, पाहा दरवाढीचे कारण Video का होतेय परीक्षा? शिक्षकांची परीक्षा घेण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे शिक्षकांची गुणवत्ता, विषय ज्ञान, स्पर्धा परीक्षेसाठी सिद्ध असण्यासाठीची तयारी तापसणे हे आहे. तसेच ज्ञान व क्षमता विकसित करण्यासाठी ही प्रेरणा परीक्षा आयोजित केली गेली आहे. परीक्षेची नियमावली शिक्षकांसाठी घेण्यात येणाऱ्या प्रेरणा परीक्षेचा प्रश्नसंच हा ए,बी,सी,डी स्वरूपात असेल. मराठवाडा विभागात एकाच दिवशी आणि एकाच वेळी ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत 50 प्रश्न आहेत. परीक्षेचा कालावधी 1 तासाचा असेल. उत्तर पत्रिका या ओएमआर मशीनद्वारे तपासल्या जातील. पालकांनो, पुस्तकांचा बदलला पॅटर्न, दप्तराचं ओझंही होणार कमी! SPECIAL REPORT शिक्षक संघटेनाच विरोध शिक्षकांची प्रेरणा परीक्षा देण्यासाठी काही शिक्षकांनी होकार दर्शवलाय. तर प्रहार या शिक्षणे संघटनेने शिक्षकांची ही परीक्षा घेऊ नये, अशी भूमिका घेत त्यासाठी विरोध दर्शवला आहे. त्याबाबतचे तसे निवेदन आयुक्तांना देखील दिले गेले आहे. ही परीक्षा घेण्यामागचा निर्णय हा स्पष्ट नसून शिक्षकांमध्ये नकारात्मक भावना वाढीस लागू शकते. जिल्ह्यात सर्व शिक्षकांशी जवळपास या विषयावर बातचीत देखील केली असून त्यानंतर ही शिक्षकांची परीक्षा घेण्यास शिक्षक प्रहार संघटनेचा विरोध असल्याचं शिक्षक प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.