जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / चला, एक झाडं लावूया! पण स्वस्तात रोपं मिळतील कुठे?

चला, एक झाडं लावूया! पण स्वस्तात रोपं मिळतील कुठे?

चला, एक झाडं लावूया! पण स्वस्तात रोपं मिळतील कुठे?

चला, एक झाडं लावूया! पण स्वस्तात रोपं मिळतील कुठे?

सामाजिक वनीकरण विभागानं तयार 12 लाख रोपं तयार केली. पाहा वृक्ष लागवडीसाठी कुठं मिळतील स्वस्तात रोपं?

  • -MIN READ Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

नागपूर, 26 जुलै: पावसाळा हा वृक्ष लागवडीसाठी अनुकूल मनाला जात असतो. याच दिवसात प्रशासनासह अनेक सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालय आदींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाचे उपक्रम राबविले जातात. अश्याच वृक्ष लागवडी सारख्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी शासनामार्फत सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने वन महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असतं. त्याच धर्तीवर यंदा नागपूर जिल्ह्यातील 15 रोपवाटिकांच्या माध्यमातून सुमारे 12 लाख रोपे तयार कण्यात आली आहेत. विशेष म्हणजे वृक्ष लागवडीसाठी अधिक प्रोत्सान मिळावे या हेतूने शासनाच्यावतीने ही रोपे सवलतीच्या दरात वितरित करण्यात येणार आहे. वृक्ष लागवड काळाची गरज दिवसागणिक वाढते शहरीकरण आणि त्यातून उद्भवणाऱ्या प्रदूषणा सारख्या अनेक समस्या या सजीव सृष्टीला कायम भेडसावत असतात. यावर एक उपाय म्हणून वृक्ष लागवडीसह त्या वृक्षाच्या वाढीसाठी प्रत्येक नागरिकाने योग्य ती काळजी घेऊन वृक्षाचे संगोपन आणि जतन व्हावे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पावसाळा हा वृक्ष लागवडीसाठी महत्त्वाचा काळ असतो. वृक्ष लागवडीसाठी या दिवसात अनेक सामाजिक संस्था आणि एनजीओ, सर्वसामान्य जनता विविध शाळा महाविद्यालये हिरीरीने सहभाग घेत वृक्ष लागवड करत असतात. अशाच वृक्ष लागवडीच्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने दिनांक 15 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये वन महोत्सव राबविला जातो. या माध्यमातून सर्वसामान्यांना वृक्ष लागवडीसाठी प्रोत्साहन देत शासन दरवर्षी सवलतीच्या दरात वृक्ष उपलब्ध करून देतात.

News18लोकमत
News18लोकमत

जिल्ह्यात सुमारे 12 लाख रोपे तयार आज घडीला नागपूर जिल्ह्यातील तेरा तालुक्याच्या ठिकाणी पंधरा रोपवाटिका आहेत. त्याद्वारे सुमारे 12 लाख रोपे तयार करण्यात आलेली आहेत. शासनाच्या आदेशानुसार ही सर्व रोपे सवलतीच्या दरात नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्यामध्ये काही जंगली प्रजाती आहेत. त्यात आवळा, बेहडा, कडूनिंब, शिसव, पिंपळ तर काही टिंबर स्पेसिसच्या वृक्षांचा समावेश आहे. रोपांचा दर आणि वृक्ष वितरणाचे स्थळ सामाजिक वनीकरण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या नागपूर जिल्ह्यात 13 तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या 15 नर्सरीमधून ही रोपे घेता येणार आहेत. या रोपांची किंमत ही त्या वृक्षाच्या ग्रेडनुसार ठरणार आहे. यामध्ये ए ग्रेडचे रोप हे 28 रुपयाला, तर बी ग्रेड चे रोप 12 रुपयाला तर सी ग्रेडचे रोप हे दहा रुपयाला अशा सवलतीच्या दरात मिळणार आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेऊन वृक्ष लागवडीच्या या उपक्रमात सहकार्य करावे, असे आवाहन नागपूर सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय अधिकारी गीता नन्नवरे यांनी केले. रानभाज्यांनी फुलला आठवडी बाजार, पाहा कधीही न पाहिलेली भाजी, Video विद्यार्थी, शेतकऱ्यांना सवलतीचा दर या उपक्रमांतर्गत शेतकरी बांधवांना साग आणि बांबू ही रोपे देखील उपलब्ध करून देण्यात आली आहेत. शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी प्रतिरोप एक रुपया अशी किंमत निर्धारित केली आहे. गेल्या काही काळापूर्वी आपण कोरोना महामारी सारख्या भयान संकटातून बाहेर निघालो आहे. त्यावेळी ऑक्सिजनचे महत्व आणि त्याचे मूल्य आज जगाला कळून चुकले आहे. वृक्ष लागवड करून आपली पृथ्वी हिरवीगार ठेवणे आणि निसर्गाचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे जतन व संगोपन करावे, असे आवाहन नन्नवरे यांनी केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात