नागपूर, 07 ऑक्टोंबर : नागपूरच्या एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत बालाजीनगर येथे एक धक्कादायक घटना घडली. काल(दि.06) रात्री 10 च्या सुमारास दुर्गा देवीची मिरवणूक निघाली होती यावेळी एका अल्पवयीन मुलाचा शॉक लागून मृत्यू झाला. पियुष केशव कावडे(वय.14) असे मृतक मुलाचे नाव आहे. दरम्यान झालेल्या घटनेमुळे विसर्जन मिरवणुकीत अचानक गोंधळ झाल्याचे दिसून आले. पियुषच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, पियुष केशव कावडे हा दुर्गामाता विसर्जन करण्यासाठी निघालेल्या मिरवणुकीत हातात झेंडा घेऊन सहभागी झाला होता. मिरवणूक बालाजी नगर येथे पोहचली तिथे रस्त्याच्या बाजूला खांबावरअसलेल्या विद्युत डिपीला लोखंडी दांडा असलेल्या झेंड्याचा स्पर्श झाला. यात विजेचा धक्का लागल्याने तो खाली पडला. मिरवणुकीत सहभागी काही तरुणांनी त्याला डिंगडोह येथील लता मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान त्याचा काही वेळात मृत्यू झाला. एमआयडीसी पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
हे ही वाचा : नेपाळमधून आलेल्या अल्पवयीन मुलीसोबत नातेवाईकाचं घृणास्पद कृत्य, लोणावळ्यातील घटनेनं खळबळ
यवतमाळमध्ये दुर्गामाता विसर्जनावेळी चाकू हल्ला
शहरातील दुर्गा मंडळाने मंगळवारी ( दि. ३) रोजी दुपारपासून मातेच्या विसर्जनाला सुरुवात केली आहे. भव्य अशा मिरवणुका काढल्या जात आहेत. या मिरवणुकीदरम्यान वाद झाला आणि आठवडी बाजार येथे एका युवकावर चाकू हल्ला करण्यात आला. त्यानंतर त्याचदिवशी रात्री साडेनऊ वाजता वाणीपुरा येथे युवकाला चाकूने भोसकले. या दोन्ही घटनेतील एका युवकाची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रवीण यशवंत केराम (वय २४, रा. तलाव फैल) असे गंभीर जखमी युवकाचे नाव आहे. पहिल्या घटनेतील जखमी पत्या नावाच्या युवकांची प्रकृती स्थिर आसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेनंतर पोलिसांनी विसर्जन मिरवणुकीतील बँड, डिजे बंद करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.
हे ही वाचा : काहीतरी मोठे करण्याच्या तयारीत असलेल्या इटालियन नागरिकांना मुंबई पोलिसांनी पकडले
पोलिसांनी रात्री १० नंतरच्या सर्वच ठिकाणचे बँड पथक जबरदस्तीने बंद करायला लावले. यावरून काही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांसोबत वाद घातला. या भागात पहिल्यांदाच विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागण्याचा प्रकार घडला आहे. पुढील ९ सप्टेंबरपर्यंत दुर्गा देवीचे विसर्जन चालणार आहे. पुढच्या काही दिवसात शहरात आणखी पोलीस बंदोबस्त वाढविण्याची शक्यता आहे.