गणेश दुडम, प्रतिनिधी
लोणावळा 07 ऑक्टोबर : नात्याला काळिमा फासणारी एक घटना लोणावळ्यात घडली आहे. यात एका तेरा वर्षीय नेपाळी अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील युवकाने अत्याचार केल्याचं उघड झालं आहे. आरोपीच्या मुसक्या काही मिनिटांत लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आवळल्या आहेत. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. औरंगाबादमध्ये विकृतीचा कळस, लुटमार करुन वृद्धेवर बलात्कार, नंतर पोलिसांवर हल्ला मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी भाजीपाला खरेदीच्या बहाण्याने मुलीला बाहेर घेऊन गेला. यानंतर त्याने निर्जनस्थळी या मुलीवर अत्याचार केला. ही मुलगी नुकतीच नेपाळ येथून लोणावळ्यात नातेवाईकांच्या घरी आली होती. मोठ्या विश्वासाने ती आणि तिचा सात वर्षीय भाऊ हा आरोपी युवक शंकर पानसिंग बहाद्दूर थापा याच्यासोबत मार्केटमध्ये गेले. यावेळी आरोपीने एका निर्जनस्थळी नेतं मुलीसोहत हे गैरकृत्य केलं. या घटनेनंतर भेदरलेल्या अवस्थेतच मुलीने घर गाठलं आणि तिने हा सर्व प्रकार घरातील लोकांना सांगितला. यानंतर घरातील लोकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला जेरबंद केलं आहे. ऑनलाइन क्लासमध्येच 59 वर्षाच्या शिक्षकाचं किळसवाणं कृत्य, पॉर्न साईट पाहून… औरंगाबादमध्ये वृद्ध महिलेवर बलात्कार औरंगाबादमधूनही दोन दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना समोर आली होती. यात एका सराईत चोरट्याने एका ज्येष्ठ महिलेला चाकूचा धाक दाखवत आधी लुटलं. त्यानंतर त्याने वृद्धेवर बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. आरोपीची हिंमत इतकी मोठी होती की त्याने पोलिसांवरही चाकू हल्ला केला. पण पोलीस त्यातून सुखरुप बचावले. संबंधित घटना ही औरंगाबादच्या वाळूज औद्योगिक परिसरात घडली आहे. आरोपीने वृद्धेला आधी चाकूचा धाक दाखवला. त्याने महिलेकडे पैशांची मागणी केली. चाकूचा धाक दाखवत त्याने वृद्धेकडे पैसे आणि दागिने लुटले. त्यानंतर आरोपीने वृद्धेसोबत अतिशय घृणास्पद कृत्य केलं.