जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Nagpur News: माहेर सोडण्याआधीच सपनाच्या घरावर हातोडा, अखेर आंदोलनातच उरकला साखरपुडा, Video

Nagpur News: माहेर सोडण्याआधीच सपनाच्या घरावर हातोडा, अखेर आंदोलनातच उरकला साखरपुडा, Video

Nagpur News: माहेर सोडण्याआधीच सपनाच्या घरावर हातोडा, अखेर आंदोलनातच उरकला साखरपुडा

Nagpur News: माहेर सोडण्याआधीच सपनाच्या घरावर हातोडा, अखेर आंदोलनातच उरकला साखरपुडा

नागपूर जिल्ह्यातील सातगाव वेना येथील माहेर सोडण्याआधीच सपनाच्या घरावर हातोडा पडला. त्यामुळे नागपुरातील आंदोलनस्थळीच साखरपुडा उरकला.

  • -MIN READ Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 4 मे: आयुष्याच्या प्रवासात एक अविस्मरणीय सोहळा म्हणजे लग्न. हा विवाह सोहळा थाटामाटात व्हावा असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र हाच सोहळा उघड्या रस्तावर करण्याची दुर्देवी वेळ एका विस्थापित कुटुंबावर ओढवली आहे. नागपूर जिल्ह्यातील सातगाव वेना ग्रामपंचायतीनं कारवाई करत गावातील अनेक घरं पाडली. ऐन साखरपुड्या दिवशीच घर पडल्यानं सपना सोनेवार हिचं लग्न मोडलं. कारवाईविरोधात आख्खं गाव नागपुरातील संविधान चौकात आंदोलनाला बसलं. आता याच आंदोलनस्थळी सपना आणि मध्य प्रदेशातील यशवंत बनवाले यांचा आगळावेगळा साक्षगंध सोहळा झाला. ग्रामपंचायतकडून अतिक्रमण हटाव मोहीम हिंगणा तालुक्यातील सातगाव वेना येथे काही दिवसांपूर्वी न्यायालयाच्या निर्देशानुसार ग्रामपंचायतीकडून अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली. यात 336 घरे पाडण्याचे आदेश जारी करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात न्यायालयातून स्थगिती आणल्याने त्या कारवाईत 115 घरी वाचली. तर उर्वरित घरांवर अतिक्रमण विभागातर्फे कारवाई केली. या जागेवर गेल्या 10 ते 15 वर्षांपासून राहणाऱ्या कुटुंबांनी कारवाईपूर्वी विस्थापितांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र शासनाकडून कुठलीही दखल न घेतल्याने नागरिकांकडून नागपुरातील संविधान चौकात आंदोलनास सुरुवात केली.

News18लोकमत
News18लोकमत

साखरपुड्याच्या दिवशी तुटले घर सातगाव वेना येथे 24 एप्रिल 2023 रोजी अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली. याच दिवशी गावात राहणाऱ्या सपना सोनेवार हिचं साक्षगंध होणार होतं. मात्र घरच नसल्यानं साक्षगंधाचा कार्यक्रम होऊ शकला नाही. परिणामी मुलीचे साक्षगंध झाले नाही आणि लग्नही मोडले. याच काळात मध्य प्रदेशातील यशवंत बनवाले या तरुणाने लग्नासाठी होकार दिला आणि अशा विपरीत परिस्थितीत देखील सपनाच्या कुटुंबासोबत खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. आंदोलन स्थळी झालं साक्षगंध आपल्या हक्काची घरं परत मिळावी आणि आपलं पुनर्वसन व्हावं, अशी गावकऱ्यांची मागणी आहे. याच मागणीसाठी गेल्या 8 दिवसांपासून कडक उन्हात आणि अवकाळी पावसात गावकरी नागपुरातील संविधान चौकात उपोषणाला बसले आहेत. या आंदोलन स्थळीच त्यांनी साक्षगंध करण्याचा निर्णय घेतला. सरकारने मुलीचे साक्षगंधाच्या दिवशी घर तोडले म्हणून घर नसल्यामुळे सपना व यशवंत यांचे साक्षगंध आंदोलनस्थळी संविधान चौक येथेच करण्याचा निर्णय झाला. दोन्ही कुटुंबाच्या परिवारातील सदस्य, गावातील रहिवासी यांच्या साक्षीने हा सोहळा संपन्न झाला, अशी माहिती युवा परिवर्तन की आवाज या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे यांनी दिली. Nagpur News: अद्भूत अशी कोराडीची महालक्ष्मी देवी, पाहा Video काय आहे आख्यायिका विस्थापितांचं पनर्वसन करा आज आमच्यावर ओढवलेल्या दुःखात माझ्या कुटुंबा सोबत संपूर्ण गाव आणि माझ्या होणाऱ्या सासरकडील कुटुंब सोबत आहे. हे माझे भाग्य आहे, असं मला वाटतं. मात्र प्रशासनाने आमच्यावर झालेला अन्याय दूर करावा आणि गावातील कुटुंबातील विस्थापितांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी सपना सोनुलकर हिने केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात