विशाल देवकर, प्रतिनिधी
नागपूर, 26 मे : मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ही म्हण नागपूरच्या अठरा महिन्याच्या श्रीनंदा देशकरनं खरी केलीय. श्रीनंदानं इतक्या लहान वयात थेट इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्वत:चं नाव नोंदवलंय. तिचं इंडिया बुकमध्ये नाव नोंद होण्याचं कारणही तितकंच खास आहे. ते समजल्यानंतर तुम्हीही तिचं नक्की कौतुक कराल.
नागपूरातील देवनगर भागात राहणाऱ्या शुभंकर आणि मधुरा देशकर यांची मुलगी असलेल्या श्रीनंदाची स्मरणशक्ती थक्क करणारी आहे. ती तिच्यापुढे ठेवलेली कोणतीही वस्तू किंवा चित्राचं इंग्रजी आणि मराठी नाव अचूक सांगू शकते. तिला पहिल्यापासून चित्राकडं पाहण्याची आवड होती. या आवडीमुळेच तिनं हा रेकॉर्ड केलाय.
श्रीनंदा आता दीडशेपेक्षा जास्त वस्तूंची नावं अचूक सांगू शकते. तसंच फळाची चवही ती ओळखू शकते. तिनं मराठी आणि इंग्रजीमध्ये 156 वस्तू चित्र आणि तोंडी स्वरुपात ओळखल्या. त्यामुळे तिनं 'प्रशंसा श्रेणी' अंतर्गत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड (IBR) मध्ये प्रवेश मिळवला. त्याचबरोबर इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड नं देखील तिची दखल घेतलीय.
कशी लागली गोडी?
'श्रीनंदाला वयाच्या 8-9 महिन्यापासूनच वृत्तपत्र आणि खेळातील कार्डवरील चित्रांचे विशेष आकर्षण होते. आमच्या राहत्या घरी 4 पिढ्या सध्या वास्तवात आहेत त्यातील श्रीनंदाचे पणजी पणजोबा, आजी आजोबा, आई बाबा, काका काकी, असे एकत्र कुटुंब आहे. तिच्याशी खेळण्यासाठी, तिला शिकवण्यासाठी अनेक वडिलधारी मंडळी तिच्याजवळ असल्यानं तिची जलदगतीनं प्रगती झाली असावी.
HSC Result : वडील दुकानात कामाला, ट्युशनची फी भरायलाही नव्हते पैसे, सोहमचं यश पाहून घरचे रडले
ती या प्राण्याचा आवाज काढू अथवा ओळखू शकते. श्रीनंदाची आवड लक्षात घेऊन सुरवातीच्या काळात आम्ही तिला लहान मुलांचे कॉमिक बुक, पिक्चर बुक, दिले. या पुस्तकांमधील चित्रांचे तिला कुतूहल होते. त्यातील बहुतांश चित्रांची ती ओळखू लागली, तसंच ती त्याची नावंही सांगू लागली,' अशी माहिती श्रीनंदाची आई मधुरा देशकरनं दिली आहे.
श्रीनंदाला वयाच्या 17 व्या महिन्यात जवळ जवळ 200 हून अधिक वस्तूंची ओळख पटली होती, त्यांचे नावे, फळांची चव, प्राण्यांचे आवाज, इत्यदी ती आपल्या बाल बोबड्या आवाजात इंग्रजी आणि मराठी भाषेत अचूक सांगू लागली. त्यावेळी आम्हाला हे विशेष असल्याचं लक्षात आलं.
इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्यासाठी अठरा महिने पूर्ण होणं आवश्यक असतात. आम्ही श्रीनंदानं अठरा महिने पूर्ण करताच त्यांच्याकडे प्रस्ताव पाठवला. त्यानंतर तिची नोंद झाली.
बिबट्यापासून ते हरण, 5 हजारांहून अधिक प्राण्यांचा वाचवला जीव, असं हे ट्रिटमेंट सेंटर, VIDEO
श्रीनंदाने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी 44 घरगुती वस्तू, 31 प्राणी आणि पक्षी, 23 खाद्यपदार्थ, शरीरराचे 12 अवयव, 12 हिंदू देवता (12), 11 फळं, 8 भाज्या आणि 6 वाहनं बिनचूक ओळखली, असं मधुरा यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Nagpur, Small girl