जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शेजारी मृतदेह, रक्तबंबाळ अवस्थेत त्याने केला फोन; समोरचं दृष्य पाहून मित्रही हादरले, भंडाऱ्यातील धक्कादायक घटना

शेजारी मृतदेह, रक्तबंबाळ अवस्थेत त्याने केला फोन; समोरचं दृष्य पाहून मित्रही हादरले, भंडाऱ्यातील धक्कादायक घटना

भंडाऱ्यात तरुणाची हत्या

भंडाऱ्यात तरुणाची हत्या

भंडाऱ्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

  • -MIN READ Bhandara,Bhandara,Maharashtra
  • Last Updated :

भंडारा, 4 एप्रिल, नेहल भुरे: जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रेमप्रकरणातून झालेल्या भांडणानंतर दोन तरुणांवर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. आवेज हसन शेख (रा. ठाणा) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर श्रेयस मुन्ना वाहाणे हा या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाला आहे, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रेम प्रकरणातून वाद  घटनेबाबत अधिक माहिती अशी की, प्रेम प्रकरणातून झालेल्या वादानंतर दोन तरुणांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दुसरा गंभीर जखमी आहे. आवेज हसन शेख असं मृत तरुणाचं नाव आहे, तर  श्रेयस मुन्ना वाहाणे हा तरुण या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. जिल्ह्यातील जवाहरनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या ठाणा न्याहारवाणी परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. घटनेनंतर पसार झालेल्या दोन्ही आरोपींनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. तन्वीर पठाण (वय 22) असं आरोपीचं नाव आहे, तर त्याच्या अन्य एका साथीदाराने देखील आत्मसमर्पण केलं आहे.

मोबाईल हरवल्याचं सांगून रेल्वेत बोलावलं, जवानांकडून धक्कादायक कृत्य; पीडित महिलांचा आरोप

  श्रेयसवर उपचार सुरू हल्ला झाल्यानंतर  रक्तबंबाळ अवस्थेत श्रेयसने ठाणा येथील आपल्या मित्रांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर  तीन ते चार मित्र घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी आवेज व श्रेयस रक्तबंबाळ अवस्थेत डांबरी रस्त्यावर पडलेले होते. दोघांनाही लगेच शहापूर आरोग्य उपकेंद्र येथे दुचाकीने हलवण्यात आले. मात्र, तोपर्यंत आवेजचा मृत्यू झाला. श्रेयसला प्राथमिक उपचारानंतर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. या प्रकरणात पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात