जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / मोबाईल हरवल्याचं सांगून रेल्वेत बोलावलं, जवानांकडून धक्कादायक कृत्य; पीडित महिलांचा आरोप

मोबाईल हरवल्याचं सांगून रेल्वेत बोलावलं, जवानांकडून धक्कादायक कृत्य; पीडित महिलांचा आरोप

मोबाईल हरवल्याचं सांगून रेल्वेत बोलावलं, जवानांकडून धक्कादायक कृत्य; पीडित महिलांचा आरोप

जवानांवर आरोप आहे की त्यांनी वाईट हेतूने महिलांना यार्डमध्ये उभा असलेल्या ट्रेनमध्ये बोलावलं. महिला तिथे पोहोचली तेव्हा तिथे दोघेजण होते.

  • -MIN READ Local18 Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

झाशी, 03 एप्रिल : रेल्वे स्टेशनवर दोन महिलांवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील झाशी इथं घडलीय. जीआरपी रेल्वेसह रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये या घटनेनं खळबळ उडाली आहे. झाशी रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वर कानपूर यार्डमध्ये उभा असलेल्या ट्रेनच्या डब्यात २ महिलांना फसवून बोलावत दोन जवानांनी धक्कादायक कृत्य केल्याचा आरोप पीडित महिलांनी केला आहे. झाशी रेल्वे स्टेशनवर घडलेल्या या प्रकाराने रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. उभा असलेल्या ट्रेनमध्ये दोन महिलांना फसवून बोलावण्यात आलं. त्यानतंर दोन जवानांनी त्यांच्यावर बलात्कार केला असा आरोप महिलांनी केलाय. महिलांच्या तक्रारीनंतर रेल्वे अधिकारी आणि जीआरपी ठाण्यातील पोलिस घटनास्थळी दाखल झाले. कानपूर यार्डमध्ये उभा असलेल्या ट्रेनमध्ये महिलांसोबत घडलेल्या या प्रकाराने आता रेल्वे स्टेशनवर महिलांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण केले आहेत. फसवून ट्रेनच्या बोगीत नेत जवानांनी बलात्कार केल्याचा आरोप महिलांनी केला आहे. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर जीआरपी आणि लष्कर पोलिस तपास करत आहेत. चमत्कार! 3 मुलांसह आईची धावत्या ट्रेनसमोर उडी; पूर्ण गाडी अंगावरुन जाऊनही बचावलं 8 महिन्यांचं बाळ, इतरांचा मृत्यू पीडित महिलांनी माहिती देताना म्हटलं की, रात्री उशिरा जीआरपी पोलिस ठाण्याजवळून जात होतो. तेव्हा एका व्यक्तीने दोन महिलांना बोलावत मोबाईल हरवल्याचं सांगितलं. मोबाईलवर कोणासोबत महत्त्वाचं बोलायचंय म्हणत बोलावलं. दोघांपैकी एक जण महिलेचा मोबाईल घेऊन उभा असलेल्या बोगीत गेला. जवानांवर आरोप आहे की त्यांनी वाईट हेतूने महिलांना यार्डमध्ये उभा असलेल्या ट्रेनमध्ये बोलावलं. महिला तिथे पोहोचली तेव्हा तिथे दोघेजण होते. महिला ट्रेनमध्ये जाताच त्यांना जवानांनी पकडले आणि त्यांच्यावर बलात्कार केला. यानंतर जवानांनी महिलांचे मोबाईलसुद्धा काढून घेतले आणि तिथून हकलून दिले असा आरोपही महिलांनी केलाय. या प्रकरणाची माहिती महिलांनी ११२ या क्रमांकावर फोन करून जीआरपी पोलिसांना दिली. धक्कादायक! ट्रेनमध्ये चढण्यावरून वाद, माथेफिरूने सहप्रवाशांनाच पेटवलं; तिघांचा मृत्यू, 9 जखमी याबाबत सीओ जीआरपी नई मंन्सूरी यांनी सांगितले की, पीडित महिलांच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही जवानांबाबत माहिती घेतली जात आहे. लवकरच या प्रकरणी तपास पूर्ण होईल आणि आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. या प्रकरणाची माहिती लष्कराला देण्यात आली आहे. लष्कराकडूनही त्यांच्या पातळीवर तपास करून आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: crime , Local18
  • First Published :
जाहिरात
जाहिरात