अमरावती, 2 नोव्हेंबर : अमरावतीत बच्चू कडू आणि रवी राणा या दोन सत्ताधारी आमदारांमध्ये पुन्हा वाद पेटण्याची चिन्ह आहे. मुंबईत रवी राणा म्हणाले, “हा वाद आता मिटला आहे. पण कोणी मला दम देत असेल, तर ते योग्य नाही. रवी राणाने उद्धव ठाकरेंचा दम मोजला नाही. त्यामुळे बच्चू कडू माझ्यासाठी छोटा विषय आहे. बच्चू कडू जर दम देऊन बोलत असेल, तर त्यांना जशास तसं उत्तर देण्यासाठी मी सक्षम आहे”, अशी प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिली आहे. यावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली.
कालच्या सभेत अमरावतीमध्ये मी सार्वत्रिक बोललो, कोणाचा कोथळा बाहेर काढू हे रवी राणा यांना मी बोललो नाही. तर कार्यकर्त्यांनी शांत रहावे. मी 5, 6, 7 या तारखेला माझ्या गावी कुरळपुर्णाला आहे. रवी राणा यांनी तलवार घेऊन यावे मी हातात फुल घेऊन तयार आहे. रवी राणा यांना जर मला मारायचे असेल त्यांनी यावे मी स्वतःच रक्त वाहून घेण्यास तयार आहे. इतरही शेतकऱ्यांचे मुद्दे आहे, त्यामुळे मी याकडे लक्ष देणार नाही, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.
रवी राणांनी केली होती, घरात घुसून मारण्याची भाषा?
"प्रेमाची भाषा रवी राणाला 100 वेळा कळते. पण कोणी दम देत असेल तर मी घरात घूसून मारू शकतो. मी सर्व वाद मिटवला. उद्धव ठाकरे आडमुठे होते. त्यांचा अहकांर धुळीत मिळाला. मग हा कोण आहे. तर मी घरात घूसून मारू शकतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझे नेते आहेत. त्यांनी मला सांगितले म्हणुन मी सगळा वाद मिटवला. बच्चू कडू माझ्यासाठी खूप छोटा विषय आहे," या शब्दात रवी राणांनी बच्चू कडूंवर प्रहार केला.
"कुणी मला दम देत असेल तर मी उद्धव ठाकरेंचा दम खाल्ला नाही, हा बच्चू कडू तर काहीच नाही. जर देऊन जर त्याला जशास तसे उत्तर मी देईल. कुठल्याही स्तरावर देईल, तो ज्या स्तरावर म्हणेन त्या स्तरावर देईन. पण प्रेमाच्या भाषेत रवी राणा एकदा नाही तर दहावेळा झुकेन. पण कुणी दम देऊन बोलत असेल तर त्याला घरात घुसून मारायची पण माझी हिम्मत आहे."
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amravati, Maharashtra politics, Ravi rana