नागपूर, 23 ऑगस्ट : सध्या सोशल मीडियाच्या जगात प्रत्येकाच्या हातात फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅपसारखे अॅप आले आहेत. मात्र, यांसारख्या अॅपच्या माध्यमातून अनेक फसवणूकीचे प्रकारही समोर आले आहेत. नागपुरातून ‘फेसबुक’वर झालेल्या मैत्रीतून दोन तरुणांनी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. दोन वेगवेगळ्या घटनांच्या माध्यमातून अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. पहिली घटना काय? फेसबुक फ्रेंड असलेल्या अल्पवयीन मुलीवर सेमिनरी हिल्सच्या परिसरात एका तरुणाने जबरदस्ती करत शारीरिक अत्याचार केले. अभिषेक प्रेमानंद इंदूरकर (वय-20) असे यातील आरोपीचे नाव आहे. त्याने 17 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत दोन वर्षांपूर्वी फेसबुकवर मैत्री केली होती. यानंतर ही मैत्री काही दिवस टिकली. मात्र, नंतर दोघांमधील बोलणे बंद झाले. यानंतर रविवारी ही पीडित अल्पवयीन मुलगी सेमिनरी हिल्स येथील एका धार्मिक ठिकाणी गेली होती. याचदरम्यान, तिला तिथे अचानक अभिषेक दिसला. त्याला पाहून ती घाबरली आणि तिने झुडपांच्या मागे लपण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिला आरोपी अभिषेक प्रेमानंद इंदूरकर याने जीवे मारण्याची धमकी दिली. इतकेच नव्हे तर लाकडी दांड्याने मारहाण केली. यावेळी दुपारची वेळ होती. त्यामुळे त्या परिसरात तिथे कुणीच नव्हते. म्हणून आरोपीने संधीचा गैरफायदा विद्यार्थिनीचा विनयभंग केला तसचे तिच्यावर बळजबरीने शारीरिक अत्याचार केले. यापकरणी तक्रार केल्यावर ठार मारेन, अशी धमकीही आरोपीने पीडित विद्यार्थिनीला दिला. हा सर्व प्रकार घरी आल्यावर तिने आपल्या कुटुंबीयांना सांगितला. यानंतर कुटुंबीयांनी जरीपटका पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, घटनेचे ठिकाण सिव्हिल लाइन्स असल्याने त्यांना गिट्टीखदान पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले. पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी अभिषेक इंदूरकर विरोधात बलात्कार, विनयभंग, पॉक्सो, मारहाण व धमकीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याला अटक केली आहे. दुसरी घटनेत अपहरण करून अत्याचार - ‘फेसबुक फ्रेंड’ने अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केला. अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. आरोपी हा 19 वर्षाचा आहे. तसेच तो तरुण गांधीबाग येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. 16 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आईचा एका शिक्षकाशी दुसरा विवाह झाला आहे. या अल्पवयीन मुलीची फेसबुकवरून आरोपी तरुणाशी ओळख झाली होती. सुमारे अडीच महिन्यांपूर्वी तरुणाने अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने वाकी परिसरात नेले. तेथे त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. तसेच याबाबत कुणाला सांगू नकोस, अशी धमकीही आरोपीने पीडितेला दिली होती. हेही वाचा - नागपूर : पेपर चांगले गेले नाही म्हणून विद्यार्थिनी तणावात, उचललं टोकाचं पाऊल मात्र, मागील काही दिवसांपासून या अल्पवयीन पीडित मुलीची प्रकृती खालावली. त्यामुळे घरच्यांनी तिला डॉक्टरांकडे नेले असता अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यानंतर कुटुंबीयांनी सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अपहरण, बलात्कार आणि पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अजून याप्रकरणातील आरोपीचा अटक झालेली नाही. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.