मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नागपूर : पेपर चांगले गेले नाही म्हणून विद्यार्थिनी तणावात, उचललं टोकाचं पाऊल

नागपूर : पेपर चांगले गेले नाही म्हणून विद्यार्थिनी तणावात, उचललं टोकाचं पाऊल

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

दिव्या नेवराम गिऱ्हारे या 19 वर्षीय आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. ती नरखेड तालुक्यातील शेंबडा येथील रहिवासी होती.

  • Published by:  News18 Desk
नागपूर, 19 ऑगस्ट : महाराष्ट्रामध्ये आत्महत्येच्या घटना सातत्याने पाहायला मिळत आहेत. परिक्षेत काही विद्यार्थी पास होतात. तर काही विद्यार्थी नापास होता. याच संदर्भात नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पेपर चांगले न गेल्यामुळे एका विद्यार्थिनीने विष पित आत्महत्या केली. काय आहे संपूर्ण बातमी - दिव्या नेवराम गिऱ्हारे या 19 वर्षीय आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. ती नरखेड तालुक्यातील शेंबडा येथील रहिवासी होती. मृत दिव्या ही बीएसस्सीच्या प्रथम वर्षाला होती. तिचे पेपर चांगले न गेल्यामुळे ती तणावात होती. याच तणावातून तिने टोकाचे पाऊल उचलले. राहत्या घरी कुणीही नसताना तिने धान्यामध्ये टाकायचे विषारी पावडर खाल्ले. यानंतर तिची प्रकृती बिघडल्याने कुटुंबीयांनी तिला आधी सावनेर येथील शासकीय रुग्णालय दाखल केले. मात्र, तिची प्रकृती बिघडल्याने पुढे नागपूर मेडिकल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याठिकाणी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी साडेनऊ वाजेच्या सुमारास 12 तारखेला घडली. याप्रकरणी नेवराम भैयालाल गिऱ्हारे (वय 48, रा. शेंबडा, ता. नरखेड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून नरखेड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. हेही वाचा - भर वर्दळीच्या ठिकाणी 35 वर्षीय महिलेचा खून, गोंदियातील सुरक्षा रामभरोसे? हादरवणारी घटना नागपूरकरमध्ये कोरोनासोबत वाढतोय स्वाईन फ्लूचा धोका - नागपुरात कोरोना पाठोपाठ आता स्वाईन फ्लू देखील डोकं वर काढत आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आणि सतर्क राहण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे. पंधरा दिवसात नागपूरमध्ये स्वाईन फ्लूमुळे पाच रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाकडून डेथ ऑडिट रिपोर्ट प्रकाशित करण्यात आलं.यामध्ये ही माहिती पुढे आली. त्यामुळे नागपूर जिल्ह्यात मागच्या दोन महिन्यात स्वाईन फ्लूमुळे झालेल्या मृत्यूचा आकडा हा 10 वर पोहोचला आहे. आता एकूण संख्या ही 211 झाली आहे. आधीच व्हायरल ताप आणि साथीच्या आजारांमुळे टेन्शन वाढत असताना नागपुरात स्वाईन फ्लूचं थैमान पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.
First published:

पुढील बातम्या