जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Amravati News : केमिस्ट हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी दिलं महत्त्वाचं अपडेट

Amravati News : केमिस्ट हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी दिलं महत्त्वाचं अपडेट

Amravati News : केमिस्ट हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी दिलं महत्त्वाचं अपडेट

उदयपूरमधील टेलर कन्हैयालाल यांच्या निर्दयी हत्येचा (Udaipur Tailor Murder Case) पॅटर्न अमरावतीमध्येही वापरण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 2 जुलै : उदयपूरमधील टेलर कन्हैयालालची हत्या होण्याच्या बरोबर एक आठवडापूर्वी अमरावतीमधील उमेश कोल्हे या 54 वर्षांच्या केमिस्टची हत्या करण्यात आली होती. कोल्हे यांनी भाजपामधील निलंबित नेत्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या बाजूनं पोस्ट लिहिली होती. याच कारणांमुळे कोल्हे यांची हत्या झाल्याचा संशय तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. उमेश कोल्हे यांचा मुलगा संकेत कोल्हे यांनी या प्रकरणात अमरावती शहरातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. या प्रकरणात 23 जून रोजी मुद्दसीर अहमद आणि शाहरूख पठाण या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीत आणखी चार जणांची माहिती मिळाली. त्यापैकी अब्दुल तौफिक, शोएब खान आणि अतिब रशिद यांना 25 जून रोजी अटक करण्यात आली. तर शमीम अहमद फिरोज अहमद अजूनही फरार आहे. उमेश कोल्हे यांची हत्या नुपूर शर्मा प्रकरणी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केल्याने हत्या झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी दिली आहे. काय आहे प्रकरण? कोल्हे 21 जून रोजी रात्री 10 ते 10.30 दरम्यान त्यांचे ‘मेडिकल स्टोर’ बंद करून घरी जात असताना हा प्रकार घडला. त्यावेळी संकेत त्याची पत्नी वैष्णवीसोबत दुसऱ्या बाईकवर होता. संकेतनं दिलेल्या तक्रारीनुसार ‘मोटारसायकलीवरून आलेल्या दोन जणांनी अचानक माझ्या वडिलांची बाईक अडवली आणि त्यांनी वडिलांची गळ्यावर चाकूनं हल्ला केला. त्यावेळी त्यांच्या गळ्यातून बरंच रक्त वाहात होते. मी माझी गाडी थांबवली आणि मदतीसाठी लोकांना ओरडून विनंती केली. त्यावेळी अन्य एक जण आला आणि त्यासोबत दोन्ही मारेकरी मोटारसायकलीवरून फरार झाले. मी आजूबाजूच्या लोकांच्या मदतीनं वडिलांना हॉस्पिटलमध्ये नेले. हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अमरावती शहर पोलिसांमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार ‘अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींनी दिलेल्या कबुलीनुसार त्या सर्वांना आणखी एका आरोपीनं मदत केली होती. त्यानं या आरोपींना पळून जाण्यासाठी एक कार आणि 10,000 रूपये दिले होते.’ उदयपूर हत्या प्रकरण : हिंदू टेलरच्या निर्दयी हत्येनंतर गेहलोत सरकारने उचललं मोठं पाऊल या प्रकरणात ‘इंडियन एक्स्प्रेस’ नं सूत्रांच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार ‘कोल्हे यांनी व्हॉट्सअपवर नुपूर शर्मा यांना पाठिंबा देणारी पोस्ट लिहिली होती.या पोस्टचा त्याच्या हत्येशी काही संबंध आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात